मुंबई : आमदारांपाठोपाठ १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. शिंदे गटात गेलेल्या १२ खासदारांचा आकडा आता पंधरावर जाणार आहे असा दावा रामटेकचे बंडखोर खासदार कृपाल तुमाने (Krupal Tumane) यांनी केला आहे. त्यामुळे ठाकरे यांच्यामागील निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींची ताकद कमी होण्याची चिन्ह आहेत. (Uddhav Thackeray | Eknath Shinde | Latest News)
कृपाल तुमाने म्हणाले, आमच्या गटात सध्या १२ आमदार आहेत, ते लवकरच १५ होतील. कारण आम्हाला गटनेता बदलवायचा होता. खासदार विनायक राऊत यांच्यापासून आम्हाला प्रचंड त्रास होता. सभागृहामध्ये कोणत्याही बिलावर बोलण्याची वेळ यायची, तेव्हा विनायक राऊत आमची नावे पाठवून द्यायचे आणि आमची बोलायची वेळ यायची, तेव्हा मात्र स्पिकर दुसऱ्यांचे नाव जाहीर करायचे. त्यामुळे आम्हाला कळतच नव्हते.
पार्लमेंट्री कमिटीच्या बुधवारच्या बैठकीत कोण केव्हा बोलणार यावर चर्चा होऊन ठरविले जायचे. पण बोलायच्या वेळी ते स्वतः किंवा अरविंद सावंत दोघेच बोलायचे. इतरांना बोलण्याची संधीच मिळत नव्हती. पार्लमेंटचा रेकॉर्ड काढून बघितला तर ही गोष्ट लक्षात येईल. हा इतर सर्व खासदारांवर मोठा अन्याय होत होता.
गेल्या वर्षभरापासून हा प्रकार सुरू होता आणि नंतर नंतर तर बुधवारची बैठक घेणेही त्यांनी बंद केले होते. त्यामुळे सर्व खासदारांचा विनायक राऊतांवर रोष होता. त्यामुळे त्यांना हटवण्याची कारवाई मागच्या अधिवेशनातच होणार होती. पण झाली नाही. त्यामुळे आम्ही आता त्यांना गटनेते पदावरून हटवले आहे, असा गौप्यस्फोटही खासदार तुमाने यांनी केला.
एकनाथ शिंदेंची सुरक्षा वाढवायलाच पाहिजे होती :
सरकारमधील मंत्र्यांना किंवा कुणालाही जिवे मारण्याची धमकी मिळाली, तर त्यांना सुरक्षा दिली पाहिजे किंवा असलेली सुरक्षा वाढविली पाहिजे. एकनाथ शिंदे नगर विकास मंत्री असताना गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यांना नक्षलवाद्यांकडून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यावेळी सरकारने त्यांना झेड प्लस सुरक्षा द्यायला पाहिजे होती. तेव्हा सरकारने एकनाथ शिंदे यांची सुरक्षा वाढवली नाही, ही त्याची चूक होती, असे खासदार तुमाने म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.