Yogesh Kadam News : सावली बारच्या 'छमछम'ने शिवसेनेच्या मंत्र्यांची झोप उडवली; योगेश कदम अडचणीत!

Anil Parab’s Serious Allegation Against Minister Yogesh Kadam:मुंबईच्या कांदिवली भागात सावली बार आहे. तिथे पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी 22 बारबाला पकडल्या गेल्या. या कारवाईत २२ बारबालांसह २२ ग्राहक व चार कर्मचाऱ्यांना पकडण्यात आले.
Dance Bar in Mumbai Linked to Minister’s Family
Dance Bar in Mumbai Linked to Minister’s FamilySarkarnama
Published on
Updated on

✅ 3 महत्वाचे मुद्दे

  1. अनिल परब यांचा गंभीर आरोप: आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत आरोप केला की गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावावर मुंबईत सावली बार नावाचा डान्सबार सुरू आहे, जो कायद्याच्या विरोधात आहे.

  2. बारवरील पोलिस कारवाई आणि पुरावे: कांदिवलीतील या बारवर पोलिसांनी छापा टाकून २२ बारबाला व २२ ग्राहकांना पकडले असून एफआयआर व परमीटची माहिती सार्वजनिक केली आहे.

  3. राजीनाम्याची मागणी व मुख्यमंत्र्यांचा प्रतिसाद: परब यांनी गृह राज्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली; मुख्यमंत्र्यांनी पुरावे दिल्यास चौकशी करू असे उत्तर दिले.

तत्कालीन उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील असताना डान्सबारला बंदी घातली होती. मात्र राज्यात राजरोसपणे डान्सबार सुरू आहेत आणि विशेष म्हणजे महसूल राज्यमंत्री यांच्या घरातच डान्सबार असेल तर काय करायचे? हे मी पुराव्यानिशी बोलत आहे, असे सांगत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत खळबळ उडवून दिली.

गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावाने मुंबईत डान्सबार असल्याचा आरोप अनिल परब यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत केला. परब यांनी योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

राज्यात डान्सबारवर बंदी असताना हा बार सुरू कसा? असाही प्रश्न परब यांनी केला. आम्ही एफआयआरची प्रत काढली. त्यानंतर या बारचे परमीट कोणाच्या नावावर आहे लक्षात आले. ज्योती कदम या राज्यगृहमंत्र्यांच्या आई आहेत. संबंधित खात्याचे मंत्री तो व्यवसाय करू शकतात का, असा सवालही परब यांनी केला.

अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना परब म्हणाले की, मुंबईच्या कांदिवली भागात सावली बार आहे. तिथे पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी 22 बारबाला पकडल्या गेल्या. या कारवाईत २२ बारबालांसह २२ ग्राहक व चार कर्मचाऱ्यांना पकडण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी पंचनामा दाखल करून आढळलेल्या ग्राहकांवर गुन्हा दाखल केला आहे. गंभीर गोष्ट म्हणजे या बारचे परमीट ज्योती रामदास कदम यांच्या नावे आहे. या महिला गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्री आहेत.

Dance Bar in Mumbai Linked to Minister’s Family
Raj-Uddhav Thackeray Alliance: राज सोबत आहे...; राजकीय युतीवर उद्धव ठाकरेंकडून अप्रत्यक्षपणे शिक्कामोर्तब

"उपमुख्यमंत्री अजित पवार योग्य ती कारवाई करतील. पण जे मुख्यमंत्री आज कारभार सांभाळत आहेत, त्यांनी गृह राज्यमंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. या प्रकरणी कारवाई झाली नाही तर सरकारचा या कृतीला पाठिंबा असल्याचे सिद्ध होईल. गृह राज्यमंत्र्यांकडूनच कायदा पायदळी तुडवला जात असेल तर हे मुख्यमंत्र्यांच्या कर्तव्यपरायणतेवर प्रश्नचिन्ह आहे," असेही परब म्हणाले.

पुरावे द्या, चौकशी करू : मुख्यमंत्री

एकीकडे तुम्ही लाडक्या बहिणींचा आपल्याला आशीर्वाद असल्याचा दावा करीत आहेत अन् दुसरीकडे आया-बहिणींना डान्सबारमध्ये नाचवता, सरकारने आजच्या आजच गृह राज्यमंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. परब यांनी मुख्यमंत्र्यांकडे कारवाई करण्याची मागणी केली असता तुम्ही मला सर्व पुरावे आणून द्या मी चौकशी करतो, असे मुख्यमंत्र्यांनी परब यांना उत्तर देताना सांगितले.

प्र1: अनिल परब यांनी कोणावर गंभीर आरोप केला आहे?
गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावावर डान्सबार असल्याचा आरोप केला.

प्र2: बारवर कारवाई केव्हा व कुठे झाली?
मुंबईच्या कांदिवली भागातील सावली बारवर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली.

प्र3: अनिल परब यांनी सरकारकडे कोणती मागणी केली?
गृह राज्यमंत्र्यांचा तत्काळ राजीनामा घेण्याची मागणी केली.

प्र4: मुख्यमंत्र्यांनी काय उत्तर दिले?
पुरावे दिल्यास चौकशी करणार असल्याचे आश्वासन दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com