Balaji Kinikar In Wari : शिवसेना आमदार किणीकर थेट 'वारी'त ; पंढरीच्या वाटेवरील पावलांची 'अशी' केली सेवा

Shivsena Mla Balaji Kinikar In Wari : आमदार डॉ. बालाजी किणीकर हे दरवर्षी आषाढी वारीनिमित्त वारकऱ्यांची सेवा करत असतात.
Balaji Kinikar In Wari
Balaji Kinikar In Wari Sarkarnama
Published on
Updated on

शर्मिला वाळुंज

Dombivali : राज्यात एकीकडे शिवसेनेच्या 'लोकप्रिय मुख्यमंत्री' या जाहिरातीवरुन युतीत वादाची ठिणगी पडली आहे. यावरुन भाजप - शिवसेनेत चांगलंच बिनसल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात जोरदारपणे सुरु आहे. विरोधकांकडून या जाहिरातीवरुन सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडलं जातंय तर युतीच्या नेत्यांची सारवासारव करताना पुरती दमछाक झाली आहे. पण याचवेळी शिवसेनेच्या आमदारानं थेट पंढरीची वारी गाठत वारकऱ्यांच्या सेवेचा अनुभव घेतला.

अंबरनाथचे शिवसेनेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर(Balaji Kinikar)यांनी शुक्रवारी(दि.१६) जेजुरी मुक्कामी वारकऱ्यांच्या पायाला मालिश करून देत वारकरी सेवेचा लाभ घेतला. त्यांच्या या सेवेची राजकीय क्षेत्रासह सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. वारकरी सेवा हीच ईश्वर सेवा मानली जात असल्याने अनेक अनुयायी आषाढी वारीला पायी जाणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करत असतात. याचदरम्यान, राजकीय नेतेमंडळीही मोठ्या प्रमाणात वारीत सहभागी होत आहेत.

Balaji Kinikar In Wari
Fadnavis Question Thackeray : सावरकरांवरून फडणवीसांनी ठाकरेंना फटकारलं ; म्हणाले, "सत्तेसाठी तुम्ही..."

शिवसेना(Shivsena)आमदार डॉ. बालाजी किणीकर हे कार्यकर्ते आणि रोटरी क्लबच्या सदस्यांसह तिथे दाखल झाले आहेत. वारीत पायी चालून वारकऱ्यांच्या पायात गोळे येत असल्याने आणि पाय दुखत असल्यानं आमदार बालाजी किणीकर यांनी वारकऱ्यांच्या पायाची मालिश करून देत त्यांची सेवा केली.

रोटरी क्लब ऑफ अंबरनाथच्या माध्यमातून माऊली ट्रस्टचे डॉक्टरांच्या डॉक्टर दिंडीसोबत आमदार डॉ. बालाजी किणीकर हे दरवर्षी आषाढी वारीनिमित्त वारकऱ्यांची सेवा करत असतात. याही वर्षी जेजुरी येथे वारीत सहभागी होत त्यांनी पायी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांची सेवा केली. या ट्रस्टच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या मेडिकल कॅम्प मध्ये वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांची आरोग्य तपासणी देखील करण्यात येत आहे.

अखंड महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आषाढी वारी(Pandharichi Wari) आहे. महाराष्ट्राच्या सर्वच भागातून लाखोंच्या संख्येने वारकरी वारीसाठी पंढरपूरला येत असतात. वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वर सेवा मानत हजारो अनुयायी आपल्या परीने या वारकऱ्यांच्या सेवेत दाखल होत असतात. आळंदीहून निघालेली ज्ञानेश्वर माऊलींची पालखी शुक्रवारी जेजुरीत मुक्कामी आहे. या वारीत हजारो वारकरी पंढरपूरकडे पायी चालत निघाले आहेत.

Balaji Kinikar In Wari
Vikhe Patil vs Lanke : निलेश लंके बालिश, त्यांना दुसऱ्यांदा निवडून यायची इच्छा दिसत नाही; विखे पाटलांचा खोचक टोला

या वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी अंबरनाथचे शिवसेना आमदार डॉ. बालाजी किणीकर हे कार्यकर्ते आणि रोटरी क्लबच्या सदस्यांसह तिथे दाखल झाले आहेत. वारीत पायी चालून वारकऱ्यांच्या पायात गोळे येत असल्याने आणि पाय दुखत असल्यानं आमदार बालाजी किणीकर यांनी वारकऱ्यांच्या पायाची मालिश करून देत त्यांची सेवा केली.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com