शिवसेना : एसी बसमध्ये आमदार बांगर आणि कल्याणकरांनी वातावरण तापवलं...

Shivsena | MLA Santosh Bangar | MLA Balaji Kalyankar | : आमदारांना हॉटेलमध्ये जाताना एसी बसची सोय
MLA Santosh Bangar | MLA Balaji Kalyankar
MLA Santosh Bangar | MLA Balaji KalyankarSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : विधान परिषद निवडणुकीमुळे राज्याच राजकारण एकाच महिन्यात दुसऱ्यांदा ढवळून निघत आहे. विधान परिषदेसाठी २० जुन रोजी होणार असलेल्या मतदानामुळे आणि मतफुटीचा धोका टाळण्यासाठी राज्यसभा निवडणुकीनंतर अवघ्या आठवड्याभरात आमदारांना पुन्हा हॉटेल मुक्कामी ठेवण्यात आले आहे. शिवसेनेने (Shivsena) आज त्यांच्या सर्व आमदारांना पवईतील रेनिसन्स हॉटेलमध्ये मुक्कामी पाठवले आहे. आमदारांना जाताना एसी बसची सोय करण्यात आली होती. (Shivsena MLA | Vidhan Parishad Latest News)

मात्र या एसीतील थंडगार हवेत देखील शिवसेना आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) आणि आमदार बालाजी कल्याणकर (Balaji Kalyankar) यांनी त्यांच्या आवाजाने वातावरण तापवलं. हॉटेलमध्ये जात असतानाच बांगर आणि कल्याणकरांनी बसमध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी-जय शिवाजी, आव्वाज कुणाचा-शिवसेनेचा अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. यामुळे बसमध्ये बसलेल्या इतर आमदारांनाही स्फुरण चढले आणि त्यांनीही घोषणा देण्यास सुरुवात केली.

विधान परिषद निवडणुकीत सध्या विजयी मतांच्या कोटा २६ वर आला आहे. महाविकास आघाडीच्या सध्याच्या संख्याबळानुसार त्यांचे सहा, यात शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आणि अपक्ष-छोट्या पक्षांच्या आमदारांच्या सहाय्याने काँग्रेसचे २ आमदार निवडून येवू शकतात. याशिवाय संख्याबळानुसार भाजपचे ४ आमदार निवडून येवू शकतात. मात्र भाजपने ५ उमेदवार दिल्याने त्यांना पाचवा उमेदवार जिंकण्यासाठी अतिरिक्त २२ मतांची गरज भासणार आहे.

अशातच हे मतदान गुप्त असल्याने भाजपसह सर्वच पक्षांनी आमदारांना हॉटेलवर मुक्कामी पाठवण्यास सुरुवात केली आहे. राज्यसभेत झालेला दगाफटका टाळण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे. तर भाजप राज्यसभेतील कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी उत्सुक आहे. महाविकास आघाडीचे तीन आमदार यात शिवसेनेच्या एका आमदाराचे निधन आणि राष्ट्रवादीच्या दोन आमदारांना न्यायालयाने परवानगी नाकारल्यामुळे ते मतदान करु शकणार नाहीत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com