Sanjay Raut  Devendra Fadnavis
Sanjay Raut Devendra Fadnavissarkarnama

भाजपच्या जन्माच्या आधी शिवसेनेचे वाघ निवडून आले ; राऊतांचा फडणवीसांना टोला

अयोध्येशी शिवसेनेचा काय संबंध आहे हे रामालाच माहिती आहे,'' असा टोला राऊतांनी भाजपला लगावला.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रविवारी हिंदुत्वाच्या मुद्यांवर भाजपवर (bjp) प्रहार केला. शिवसैनिकांना संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी भाजपवर सडकून टीका केली. त्या टीकेला प्रत्युत्तर देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सोमवारी शिवसेनेवर टीका केली. शिवसेना आणि भाजपच्या युतीचा इतिहास त्यांनी मांडला. फडणवीसांच्या टीकेला शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उत्तर दिलं.

''अयोध्येच्या लढ्यातील शिवसेनेचं काम ऐतिहासिक आहे. रामजन्मभूमीचा थंड झालेला लढा तेव्हा उद्धव ठाकरे यांनी त्या ठिकाणी दोनवेळा जाऊन जागृत केला. त्यामुळे अयोध्येशी शिवसेनेचा काय संबंध आहे हे रामालाच माहिती आहे,'' असा टोला राऊतांनी भाजपला लगावला.

Sanjay Raut  Devendra Fadnavis
कोणी कोणाला पोसलं ; युती तुटल्यानंतर तुमचं काय झालं ; भाजपचा टोमणा

राऊत म्हणाले, ''राम मंदिर आंदोलनात शिवेसेनेची भूमिका काय हे सर्वांना माहिती आहे. शिवसेनेने भाजप पक्षाच्या जन्मतारखेचा दाखला आणला तर उत्तर देणे सोप होईल. जनतापक्षाचे पतन झाल्यानंतर १९८० मध्ये भाजपची स्थापना झाली. शिवसेनेचा जन्म १९६९ मधील आहे. शिवसेनेचा पहिले महापौर हेमचंद्र गुप्ते होते ते कधी महापैार कधी होते ? किती नगरसेवक निवडून आले होते ? या संदर्भातील एखादं अभ्यास शिबीर रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठानमध्ये आयोजित करायला पाहिजे. कोणाला आस्वाद घ्यायचा असेल तर त्यांनाही येई द्या. वामनराव महाडिक पाहिले आमदार त्याच काळात निवडून आले , गिरगावात प्रमोद नवलकर, माजगावत छगन भुजबळ निवडून आले होते,''

Sanjay Raut  Devendra Fadnavis
Uttarakhand Assembly : बिपीन रावत यांच्या कन्येला भाजपची ऑफर

''महापालिकेच्या निवडणुका राजकीय पक्षाकडून लढवल्या जातात नाही, भाजप पहिल्या क्रमांकाचा विरोधी पक्ष आहे, ते कायम विरोधी पक्ष म्हणून राहो. उद्धव ठाकरे यांच्या भाषणात काही बोलायलाच नव्हतं, मग एवढी मोठी पत्रकार परिषद घेऊन दखल का घेताय,'' असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.

Sanjay Raut  Devendra Fadnavis
शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांवर चालत आहे का ? भाजपचा मुख्यमंत्र्यांना सवाल

'भाजपच्या जन्माच्या आधी आमचे वाघ निवडून आले होते, फडणवीसांचा तेव्हा मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकारणाशी सबंध नव्हता. फडणवीसांच्या जन्माच्या आधीच्या या गोष्टी आहेत,'' असा खोचक टोला राऊतांनी यावेळी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com