Sanjay Raut On Ajit Pawar: प्रफुल पटेलांना वाचवण्यासाठी 'दादां'ची सारवासारव; संजय राऊतांचा निशाणा

Sanjay Raut and Praful Patel News: भाजपला मलिक चालत नाहीत मग प्रफुल पटेल कसे चालतात ? राऊतांचा सवाल
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama

Mumbai News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना महायुतीत घेता येणार नाही, अशा आशयाचं पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना लिहिलं होतं. या पत्रानंतर मोठी चर्चा रंगली. पण यानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांच्यावर इक्बाल मिर्ची प्रकरणावरून जोरदार टीका झाली. तसेच भाजपला मलिक चालत नाहीत मग प्रफुल पटेल कसे चालतात ?, असा सवाल उपस्थित करण्यात आला.

आता यावरूनच ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनीही भाजप आणि अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला. मलिकांबद्दल फडणवीसांनी लिहिलेलं पत्र गैरसमजातून होतं, अशी प्रतिक्रिया देत उपमुख्यमंत्री पवार यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला होता. पण यावरच राऊतांनी भाष्य करत "प्रफुल पटेलांना वाचवण्यासाठी ती सारवासारव सुरु आहे", असा आरोप केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sanjay Raut
Maratha Reservation : मागासवर्ग आयोगाच्या राजीनाम्याचा आरक्षण याचिकेवर परिणाम नाही?

"प्रफुल पटेल यांचे इक्बाल मिर्ची प्रकरण बाहेर आले, त्यामुळे त्यांना ठसका लागला. आमचं म्हणणं असं आहे, मलिकांना एक न्याय आणि पटेलांना दुसरा न्याय का ? याला ढोंग म्हणतात, दोघांवरही आरोप सापखेच आहेत, मग मलिकांना वेगळी वागणूक आणि पटेलांना मात्र, गृहमंत्री आणि पंतप्रधानांच्या भेटी घडवता, हा आक्षेप आहे", असा निशाणा त्यांनी साधला.

'हे सगळे कमळाबाईचे गुलाम...'

"शिंदे गटाच्या खासदारांना आता वाटतं की भाजप जास्त प्रभावी आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेपेक्षा जास्त प्रभावी त्यांना भाजप (BJP) वाटतंय. शिवसेनेकडून शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण काढून घेण्यासाठी भाजपने जे कट कारस्थान केलं, ते आता उघड झालं आहे. मात्र, हे सगळे कमळाबाईचे गुलाम आहेत. त्यामुळे ते भाजपच्या चिन्हावर निवडणुका लढू शकतात", असा टोला खासदार राऊत (Sanjay Raut) यांनी लगावला. ते नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

(Edited by- Ganesh Thombare)

Sanjay Raut
Raosaheb Danve: गोळीबार सुरू होता, आम्ही सर्व खासदार सभागृहात होते, अतिरेकी शिरले...!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com