Maharashtra Politics : आरशात पाहा, आपली लायकी अन् औकात कळेल; श्रीकांत शिंदेंचा आदित्य ठाकरेंवर घणाघात

Shrikant Shinde on Aditya Thackeray: आमच्यावर बाळासाहेबांचे, धर्मवीर आनंद दिघे यांचे व आमच्या आई-वडिलांचे चांगले संस्कार आहेत. पराभव जेव्हा समोर दिसतो तेव्हा माणूस तडफडतो.
Shrikant Shinde on Aditya Thackeray
Shrikant Shinde on Aditya ThackeraySarkarnama

Maharashtra Politics News : "एकनाथ शिंदे यांना अटकेची भीती वाटत होती , म्हणून ते भाजपसोबत गेले, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे. कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंना सुनावले आहे. "आपल्या लायकीप्रमाणे आपण बोललं पाहिजे , लायकी नसताना आपण ज्यांच्यावर बोलतो ते जनता बघत असते, 20 तारखेला जनताच त्यांना उत्तर देईल," अशा शब्दांत शिंदेंनी ठाकरेंना (Aditya Thackeray) फटकारले.

"आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी खरपूस समाचार घेतला आहे. आमच्यावर बाळासाहेबांचे, धर्मवीर आनंद दिघे यांचे व आमच्या आई-वडिलांचे चांगले संस्कार आहेत. पराभव जेव्हा समोर दिसतो तेव्हा माणूस तडफडतो. आरशामध्ये पाहिलं की आपली पात्रता, आपली लायकी काय? आपली औकात काय? हे कळेल," अशी घणाघाती टीका श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंवर केली आहे .

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार श्रीकांत शिंदे हे कल्याण पूर्व मतदारसंघातील नगरसेवकांसह राजकीय नेते, प्रतिष्ठित नागरिकांच्या भेटीगाठी घेत आहेत. डोंबिवलीत श्रीकांत शिंदे यांनी काँग्रेस नगरसेवकांचीदेखील भेट घेतली होती . त्यामुळे राजकीय वर्तुळात सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या.

निवडणुकीचा प्रचार करतोय नेहमीप्रमाणे विविध प्रतिष्ठित नागरिकांच्या स्वतः भेटी घेत असतो. निवडणुकीत नागरिकांना भेटणं ही एक परंपरा आहे. गेल्यावेळी आले होते आता यायला पाहिजे, अशी अपेक्षा प्रतिष्ठित नागरिकांचीदेखील असते. यंदा सगळीकडे जास्त उत्साह आहे . आमचं कामच आहे सगळ्यांना भेटणं विरोधकांना पण भेटणं, भेटल्यामुळे बोलण्यामुळे खूप प्रश्न मार्गी लागतात, असे शिंदे म्हणाले.

Shrikant Shinde on Aditya Thackeray
Sangali Politics: काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटलांचा प्रचार करताना माजी आमदाराच्या गाडीवर दगडफेक

मंगळवारी (23 एप्रिल) बुलडाणा येथे मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांची जाहीर सभा झाली. या सभेतच मुख्यमंत्र्यांनी 'नीच' शब्दावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागले. “आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासाठी अपशब्द वापरला. माझ्यासाठी अशा शब्दाचा वापर केला जातोय. जर एखाद्या शेतकऱ्याचा मुलगा, सर्वसामान्य कामगाराचा मुलगा मुख्यमंत्री होतोय तर ठाकरेंना सहन होत नाही,” असे मुख्यमंत्री म्हणाले,

नक्की काय म्हटले होते एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांनी बुलडाण्यातील सभेत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत म्हटले की, "उबाठामध्ये ‘बाप 1 नंबरी आणि बेटा 10 नंबरी’ आहेत. आदित्य ठाकरेंनी माझ्यासाठी अपशब्दाचा वापर केला.

एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला, हे त्यांना सहन झालेले नाही. त्यांनी माझा नाही तर गोरगरीब, शेतकरी माता भगिनी आणि माझ्या समाजाचा अपमान केला आहे." आता याचे उत्तर तुम्ही मतपेटीतून द्या, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी मतदारांना केले आहे.

R

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com