Thackeray group Vs shinde group : ठाकरे गटाच्या ताब्यातून मुंबई महापालिका घेण्यासाठी भाजप, मनसे, शिंदे गटाने जोरदार तयारी केली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गट-ठाकरे गट यांच्यात विकास कामावरुन चढाओढ लागली आहे. विविध कामांवरुन दोन्ही गटामध्ये श्रेयवादावरुन जुंपली आहे. (Thackeray group Vs shinde group news update)
प्रभादेवी परिसरात एल्फिन्सटन विभागातील विकासकामांवरुन शिंदे गट-ठाकरे गट आज (सोमवारी) आमनेसामने आले. दोन्ही गटांमध्ये शाब्दीक चकमक झाली. पोलिसांनी हस्तक्षेप करीत काही जणांना ताब्यात घेतले होते.
एल्फिन्स्टन विभागातील मुरलीधर सामंत मार्ग, फिटवला रोड फुटपाथ नूतनीकरणाचे उदघाटन ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी यांच्या हस्ते होणार आहे. या उद्धघाटनाला शिंदे गटाने विरोध केला आहे.
येथील रस्त्याचे डांबरीकरण आणि फुटपाथ नूतनीकरण पूर्ण झाले आहे. याचा लोकापर्णासाठी शिंदे गटाचे माजी नगरसेवक समाधान सरवणकर हे त्या ठिकाणी पोहचले. हे ठाकरे गटाला समजल्यावर त्या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते आले. त्यांनी शिंदे गटाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यास सुरवात केली, यावेळी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमुळे चांगलीच जुंपली.
'पन्नास खोके-एकदम ओके'
सरवणकर यांना विरोध केल्याने येथे काही काळ तणाव होता. पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. काही जणांना ताब्यात घेतले. 'पन्नास खोके-एकदम ओके'अशा घोषणा ठाकरे गटाचे कार्यकर्ते देत होते. महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमोरच हा सगळा प्रकार घडला.
मी पुढाकार घेतला..
समाधान सरवणकर म्हणाले, "रस्त्याचे डांबरीकरण आणि फुटपाथ नूतनीकरणांच्या कामासाठी मी पुढाकार घेतला होता, आम्ही विकास कामे सुरुच ठेवणार आहोत. आमदार अजय चौधरी यांच्याबाबत मी बोलणार नाही,"
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.