Uddhav Thackeray : "तुम्हीच पक्षासोबत गद्दारी केली..."; राज ठाकरेंच्या 'त्या' टीकेला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर

Uddhav Thackeray counters Raj Thackeray's betrayal claims: "2019 पासून राज्याच्या राजकारणात आतापर्यंत जे घडलं त्याला केवळ उद्धव ठाकरे हा एकमेव माणूस कारणीभूत आहे. 2019 च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपला निवडून दिल. शिवेसना उठली आणि आणि ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली, त्यांच्यासोबत जाऊन बसली ती फक्त मुख्यमंत्रिपदाची माळ गळ्यात घालण्यासाठी."
Raj Thackeray | Uddhav Thackeray
Raj Thackeray | Uddhav Thackeraysarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 19 Nov : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या भाषणातून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर सतत टीका करत आहेत. अशातच काल शिवडीमधील प्रचाराच्या शेवटच्या सभेतूनही त्यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.

या सभेतून त्यांनी उद्धव ठाकरे हेच खरे गद्दार असून त्यांच्यामुळे शिवसेना (Shivsena) फुटल्याचा गंभीर आरोप केला होता. राज ठाकरेंच्या याच टीकेला आता उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. महाविकास आघाडीचे वांद्रे पूर्वमधील उमेदवार वरुण सरदेसाई यांच्या प्रचार सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, "एक पक्ष आहे कोणता तरी, आधी झेंडा वेगळा होता, आता झेंडा बदलला आहे.

त्यानंतर इंजिन इकडे तिकडे झालं. आधी मनसे होतं त्याच आता गुनसे झालं आहे. गुजरात नवनिर्माण सेना, जो महाराष्ट्राचा घात करेल, त्याला गुनसे साथ देणार, हे त्यांनी ठरवलं आहे. काही ध्येय नाही, धोरण नाही, दिशा नाही, काहीही वाटेल ते बोलायचं आजही काहीतरी बोलले आहेत." असं म्हणत त्यांनी राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) वक्तव्याचा समाचार घेतला.

Raj Thackeray | Uddhav Thackeray
Chhatrapati Sambhajinagar : मतदानाआधीच मतदारांच्या बोटाला लावली शाई, पैसे वाटपावरून ठाकरे-शिंदेसेना आमनेसामने

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

राज ठाकरे म्हणाले, "2019 पासून राज्याच्या राजकारणात आतापर्यंत जे घडलं त्याला केवळ उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हा एकमेव माणूस कारणीभूत आहे. 2019 च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपला निवडून दिल. शिवेसेना उठली आणि आणि ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली, त्यांच्यासोबत जाऊन बसली ती फक्त मुख्यमंत्रिपदाची माळ गळ्यात घालण्यासाठी.

Raj Thackeray | Uddhav Thackeray
Election Commission Raid's : अबब..पैशांचा महापूर! निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची धडाकेबाज कामगिरी,'इतक्या' कोटींची रोकड अन् काय काय...

स्वत:च्या स्वार्थासाठी. देशाच्या राजकारणात आतापर्यंत अशी गोष्ट पाहिलीच नाही. राहुल गांधींसोबत हे बसतात कारण स्वत:चा स्वार्थ. एका माणसाने अख्या पक्षाची वाट लावली. निघून गेलेल्या लोकांना हे गद्दार म्हणतात. असे गद्दार तर घरात तिथं बसलाय. ज्याने पक्षाशी गद्दारी केली."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com