LokSabha Elections 6th Phase Voting : धक्कादायक! मंत्र्याचेच नाव मतदारयादीत नाही; तब्बल 20 मिनिटे रांगेत उभे...

S Jaishankar : निवडणुकीच्या या सहाव्या टप्यात देशातील 8 राज्यांमधील एकूण 58 लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. त्यात आज 58 जागांचा समावेश आहे. लोकांनी विक्रमी संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे.
S Jaishankar
S Jaishankar Sarkarnama

Loksabha Election 2024 लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदान शनिवारी होत आहे. या टप्प्यात राजधानी दिल्लीत लोकसभेच्या (Delhi Voting) सात जागांवर मतदान होत आहे. तसेच निवडणुकीच्या या सहाव्या टप्यात देशातील 8 राज्यांमधील एकूण 58 लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. यामध्ये दिल्लीसोबतच, उत्तर प्रदेशातील 14, हरियाणातील10, बिहार आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी 8, ओडिशातील 6, झारखंडमधील 4 आणि जम्मू-काश्मीरमधील एका जागेवर मतदान पार पडत आहे.

यातच, केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकरही (S Jaishankar Voting) मतदानासाठी मतदान केंद्रावर पोहोचले. मात्र, सुमारे 20 मिनिटे रांगेत उभे राहिल्यानंतर त्यांचे नाव मतदारयादीत नसल्याचे समोर आले. अशा परिस्थितीत ते मतदान न करताच घरी परतावे लागले. त्यांनी घरी पुन्हा तपासणी केली असता त्यांचे मतदान केंद्र वेगळे असल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. तसेच लोकांनी विक्रमी संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले. LokSabha Elections 6th Phase Voting

मतदार यादीत नव्हते एस. जयशंकर यांचे नाव

केंद्रीय मंत्री एस. जयशंकरसोबतची ही संपूर्ण घटना शनिवारी सकाळी घडली. तुघलक लेनमधील अटल आदर्श शाळेत जयशंकर (S Jaishankar Voting) यांचे नाव मतदार यादीत सापडले नाही, जेथे ते सकाळी मतदानासाठी गेले होते. यावेळी ते मतदानासाठी सुमारे 20 मिनिटे रांगेतही थांबले. मात्र, त्यांचे नाव मतदार यादीत आढळून न आल्याने ते घरी आले. घरी येऊन पुन्हा तपासणी केली. त्यानंतर दुसऱ्या कोणत्यातरी केंद्रावर त्यांचे नाव आढळून आल्याने त्यांनी तेथे पोहोचून मतदानाचा हक्क बजावला. Lok Sabha Election 2024 Phase 6 LIVE

S Jaishankar
Arvind Kejriwal : भाजप अन् इंडिया आघाडीला किती जागा मिळणार? अरविंद केजरीवालांनी थेट आकडाच सांगितला

जयशंकर हे त्यांच्या केंद्रावर मतदान करणारे पहिले पुरुष मतदार ठरले

नवी दिल्लीच्या (Delhi) जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या वतीने एस. जयशंकर यांना त्या मतदान केंद्रावर पहिला पुरुष मतदार बनल्याचे प्रमाणपत्रही देण्यात आले. त्यांनी X वर फोटो पोस्ट करत मतदान करण्याचे अवाहन केले.

लोकांना विक्रमी मतदान करण्याचे आवाहन केले

एस. जयशंकर यांनी केवळ मतदानाचा हक्क बजावला नाही. तर इन्स्टाग्रामवर आपला मतदानानंतरचा फोटो शेअर करताना त्यांनी इतर लोकांनाही मतदान करण्याचे आवाहन केले. जयशंकर यांनी X वरील पोस्टमध्ये लिहिले- 'आज सकाळी नवी दिल्लीत मी मतदानाचा हक्क बजावला. लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) या सहाव्या टप्प्यात विक्रमी मतदान करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

S Jaishankar
Pune Hit and Run Case : मोठी बातमी..! 'हिट अ‍ॅन्ड रन' प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्रकुमार अगरवाल यांना अटक, कारण...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com