Video Uddhav Thackeray : 'एक तर तुम्ही राहाल नाही तर मी', उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना इशारा

Uddhav Thackeray party meet Devendra fadnavis Narendra Modi : मुंबईत ठाकरे गटाचा मेळाव्या उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत होते. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी या मेळाव्यात रणनीतीची चर्चा होण्याची शक्यता आहे.
Uddhav Thackeray News
Uddhav Thackeray NewsSarkarnama
Published on
Updated on

Uddhav Thackeray News : एक तर तुम्ही राहाल नाही तर मी. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तुमची गुर्मी उतरवतो, असे खुले चॅलेंज उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता दिले. मी असा नडलो की मोदीं देखील घाम फुटला, असा टोला देखील उद्धव ठाकरे यांनी लोकसभेच्या निकालावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लगावला.

मुंबईत ठाकरे गटाचा मेळाव्या उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत होते. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी या मेळाव्यात रणनीतीची चर्चा होण्याची शक्यता आहे.

'अनिल देशमुखांनी सांगितले मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्याचा डाव होता. आता तू तरी राहशील नाही तर मी तरी. माझ्याकडे पक्ष नाही, चिन्ह नाही, पैसा नाही पण मी फक्त तुमच्या जीवावर हे आव्हान देतो आहे', असे उद्धव ठाकरे म्हणाले.

महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या यशावरून ठाकरेंनी नरेंद्र मोदींना टोला लगावला. लोकसभा निवडणूक आपण असे लढलो की मोदींनाही घाम फुटला. त्यांचे भाषण ऐकताना कीव येत होती. आपल्यासाठी हे शेवटचे आव्हान आहे, असे म्हणत ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांना सज्ज राहण्याचे आवाहन केले.

यांनी आपला पक्ष आणि कुटुंब फोडला. मुंबई टिकवण्यासाठी आपल्याला लढा द्यायचा होता. आपल्या हक्काच्या मुंबईत आपल्याला असे वागवले जात आहे. हे सगळं दोन व्यापारी करत आहेत. त्यांची वृत्ती आपल्याला मुळासकट उपटून टाकायची आहे.शिवसेना ही गंजलेली तलवार नाही, तर तळपती तलवार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com