
Sanjay Raut Saam Marathi interview : शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी हिंदूहृयसम्राट बाळासाहेब ठाकरेंवर चित्रपट केला.
यानंतर संजय राऊत कामगारनेते, पत्रकार आणि संसदपटू तसेच भारताच्या समाजवादी चळवळीतील महत्त्वाचे नेते असलेले जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर चित्रपट बनवण्याची तयारी करत होते. या चित्रपटाची स्क्रिप्ट देखील तयार होती. परंतु ती स्क्रिप्ट ईडीवाल्यांनी कशी नेली, याचा किस्सा संजय राऊत यांनी सांगितला.
'सकाळ (Sakal) माध्यम समूहा'च्या साम मराठी वृत्तवाहिनीला 'ब्लॅक अॅण्ड व्हाईट' या सदरामध्ये खासदार संजय राऊत यांची मुलाखत झाली. तुरुंगातल्या आठवणी सांगताना, 'नरकातला स्वर्ग' पुस्तकावर त्यांनी भाष्य केले. अजून काही लिहिण्याचं राहून गेलं आहे का, हे सांगताना खूप काही राहून गेलं आहे. पण मी रोज लिहितो. खूप लिहितो. आजच्या अग्रलेखात काय लिहिलं आहे, ते लक्षात राहत नाही. पण खूप लिहितो, असे खासदार राऊत यांनी सांगितले.
ठाकरेंवर चित्रपट केल्यानंतर पुन्हा चित्रपटांकडे वळला नाहीत, यावर बोलताना, तसं काही नाही. जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर चित्रपटाची तयारी केली होती. सर्व तयारी पूर्ण झाली होती. स्क्रिप्ट तयार होते. बजेट तयार होते. परंतु कामाला सुरवात करणार तेवढ्यात, 'ईडी'ची कारवाई सुरू झाल्याचं खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितले.
संजय राऊत म्हणाले, "जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर स्क्रिप्ट लिहून तयारी होती. त्याच स्क्रिप्टच्या मागे बजेट तयार होते. 'ईडी'वाल्यांना काही कळत नाही. त्यांना ते आकडे दिसले. अनेक कागदपत्रांमध्ये त्यांनी ते स्क्रिप्ट देखील ताब्यात घेतलं". काहीतरी मोठं आहे समजून, 'ईडी'वाल्यांनी ती स्क्रिप्ट देखील घेऊन गेले. आता ते स्क्रिप्ट पुन्हा मिळावं, यासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. परत मिळाल्यावर पुन्हा काही करता येईल का ते पाहू? असे संजय राऊत यांनी म्हटले.
जॉर्ज मॅथ्यू फर्नांडिस कामगारनेते, पत्रकार आणि संसदपटू होते. भारताच्या समाजवादी चळवळीतील महत्त्वाचे नेते आहेत. ते जनता दल (संयुक्त) पक्षातील एक ज्येष्ठ होते. याशिवाय त्यांनी 1994 साली नितीशकुमार यांच्यासोबत समता पक्षाची स्थापना केली होती. केंद्रीय मंत्री या नात्याने उद्योग, रेल्वे आणि संरक्षण या खात्यांसह अनेक खात्यांचा कार्यभार त्यांनी सांभाळला. त्यांचा मृत्यू 29 जानेवारी 2019 रोजी 88 व्या वर्षी झाला.
जॉर्ज फर्नांडिस सर्वप्रथम 1967 मध्ये दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे पक्षाचे ज्येष्ठ नेते स. का. पाटील यांचा पराभव करून लोकसभेत प्रवेश केला. मात्र 1971च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. इंदिरा गांधी सरकारला त्यांनी कडाडून विरोध केला. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एकमेव रेल्वे कर्मचारी संपाचे त्यांनी 1974मध्ये नेतृत्व केले. आणीबाणीच्या कालावधीत एक आरोपी म्हणून त्यांनी तुरुंगवासही भोगला. मुंबई बंद करण्याची ताकद असलेल्या दोन नेत्यांमध्ये बाळासाहेब ठाकरे आणि जॉर्ज फर्नांडिस यांचे नाव घेतले जाते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.