Rahul Gandhi Defamation Case : राहुल गांधींना आज दिलासा मिळणार का ? : सुरत सत्र न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष...

Rahul Gandhi Surat Court Hearing : शिक्षेला स्थगिती द्यावी, अशी मागणी केली होती.
Rahul Gandhi
Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

Rahul Gandhi Modi Surname Defamation Case Surat Court Hearing Update : "सर्व चोरांचे आडनाव मोदी का?" या विधानासाठी दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या खटल्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दोषी ठरवण्यात आले आहे. गुजरातच्या सुरत सत्र न्यायालयाने त्यांना २ वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

मोदी आडनाव प्रकरणी राहुल गांधी यांची 2 वर्षांची शिक्षा कायम राहणार की रद्द होणार, याचा निर्णय आज होण्याती शक्यता आहे. न्यायालयाने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली आहे. त्यानंतर राहुल गांधी यांनी सुरत सत्र न्यायालयात या संदर्भात अपिल केलं आहे. न्यायालयात केलेल्या अपिलमध्ये कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या शिक्षेला स्थगिती द्यावी, अशी मागणी केली होती.

Rahul Gandhi
Karnataka Election : भाजपचे नेते येदियुरप्पांचा नातू JDS कडून रिंगणात ; बारा उमेदवार बदलले..

या प्रकरणात याचिकाकर्ते पुर्णेश मोदी यांना न्यायालयाने नोटीस बजावली होती. या प्रकरणावर पुर्णेश मोदी यांनी न्यायालयाला आपलं म्हणणं सादर केलं आहे. या मध्ये त्यांनी ही हार जीत ची लढाई नाही. ही समाजिक लढाई असल्याचं म्हटलं आहे.

Rahul Gandhi
PCMC News : होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑ़़डिटची सूचना अंमलात आणली असती, तर पाच निष्पाप जीव गेले नसते..

राहुल गांधी म्हणाले होते..

कोर्टाने 52 वर्षीय राहुल गांधी यांना मानहानी प्रकरणात दोषी ठरवत दोन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. १३ एप्रिल२०१९ रोजी कर्नाटकातील कोलार येथे एका निवडणूक सभेत राहुल गांधी म्हणाले की नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी हे आडनाव सारखे का आहे? सगळ्या चोरांची आडनाव मोदी का? राहुल गांधी यांच्या या वक्तव्याबाबत भाजपचे आमदार आणि माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी त्यांच्याविरोधात फौजदारी मानहानीचा गुन्हा दाखल केला होता.

Rahul Gandhi
Karnataka Election News: प्रचारात कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्याचं इमोशनल कार्ड ; म्हणाले, 'ही माझी..'

काय झालं कोर्टात ?

काँग्रेसचे नेते राहुल गांधी कोर्टात न्यायाधीशांना म्हणाले, माझा हेतू चुकीचा नव्हता., मी जे बोललो ते राजकारणी म्हणून बोललो. देशातील भ्रष्टाचाराचा मुद्दा मी नेहमीच मांडत आलो आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com