Onion Rate Issue : शेतकऱ्यांकडील कांदा 'कवडीमोलाने' विकायचा का? वडेट्टीवारांची फडणवीसांना विचारणा..

Vijay Wadettiwar On Onion Rate Issue: "40 टक्के निर्यात कर मागे घेतले गेले तर, शेतकऱ्यांच्या खिशात दोन अधिकचे पैसे पडतील."
Vijay Wadettiwar - Onion Farmer - Devendra Fadnavis
Vijay Wadettiwar - Onion Farmer - Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : कांदाप्रश्न हा पुन्हा एकदा राजकीय पटलावर संघर्षाचा मुद्दा ठरत आहे. नाफेडने दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 40 टक्के निर्यात कर लावल्याने राज्यात आणि विशेष करून कांदा पट्टा असलेल्या नाशिक, नगर, पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून तीव्र प्रतिक्रिया येत आहे. या मुद्द्यावरून विरोधकांकडून रस्त्यावर आंदोलन करण्यात येत आहे. विधानसभेतील विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला धारेवर धरले आहे. (Latest Marathi News)

Vijay Wadettiwar - Onion Farmer - Devendra Fadnavis
Ahmednagar News : कांदा निर्यातीवर 40 टक्के कर ! 'स्वाभिमानी' संतापली...रविवारी राहुरीत तीव्र आंदोलन...

सरकारने दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याची घोषणा केल्याने, आता शेतकऱ्यांकडे पडून असलेल्या चाळीस मेट्रिक टन कांद्यांचं काय करायचं? असा सवाल विरोधकांकडून विचारला जात आहे. वडेट्टीवार यांनी याच मुद्द्यावरून ट्विट करत सरकारला शेतकऱ्यांचा उर्वरित कांदा काय कवडीमोल भावाने विकायचा का? असा सवाल उपस्थित केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना त्यांनी थेट सवाल केला आहे.

वडेट्टीवार म्हणाले, "राज्यातील शेतकऱ्यांकडे 40 लाख मेट्रिक टन कांदा शिल्लक आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केवळ 2 लाख मेट्रिक टन कांदा राज्य सरकार खरेदी करणार असल्याची घोषणा काल केली. शेतकऱ्यांनी शिल्लक 38 लाख मेट्रिक टन कांदा कवडीमोल भावात विकायचा का ?" असा सवाल त्यांनी फडणवीसांना केला आहे.

Vijay Wadettiwar - Onion Farmer - Devendra Fadnavis
Ajit Nawale On Onion Rate: '40 लाख मेट्रिक टन कांदा पडून; निर्यात कर रद्द केल्याशिवाय..'; अजित नवलेंची आग्रही मागणी

दरम्यान, दोन लाख टन खरेदीचा सरकारचा निर्णय म्हणजे तात्पुरता उपाय आहे. शेतकऱ्यांकडे 40 लाख टन कांदा पडून आहे. विदेशात कांद्याला मागणी असताना जर का 40 टक्के निर्यात कर मागे घेतले गेले तर, शेतकऱ्यांच्या खिशात दोन अधिकचे पैसे पडतील. त्यामुळे निर्यात कर रद्द करून कांद्याला सरकारने योग्य भाव देणे, हाच कांदा प्रश्नावर योग्य मार्ग असल्याची भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com