Shweta Singh: "श्वेता सिंह DGCAत बसून मोठं रॅकेट चालवतात"; रोहित पवारांनी आरोप केलेली महिला कोण? महाराष्ट्रातील राजकीय कुटुंबाशी आहे कनेक्शन

Shweta Singh: श्वेता सिंह या अधिकारी महिलेवर अनेक गंभीर आरोप करत ती महाराष्ट्रातील एका राजकीय कुटुंबाशी संबंधीत असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं आहे.
Rohit Pawar allegations on Shweta Singh regarding Ajit Pawar plane accident
Rohit Pawar allegations on Shweta Singh regarding Ajit Pawar plane accident
Published on
Updated on

Shweta Singh: राज्याचे ज्येष्ठ नेते दिवंगत अजित पवार यांच्या अपघाती निधनाबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. अजित पवारांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत अपघाताबाबत आक्षेप नोंदवणारे मुद्दे प्रेझेंटेशनद्वारे मांडले. यामध्ये त्यांनी एक खबळजनक नाव घेतलं, ते म्हणजे श्वेता सिंह! या महिलेवर अनेक गंभीर आरोप करत ती महाराष्ट्रातील एका राजकीय कुटुंबाशी संबंधीत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Rohit Pawar allegations on Shweta Singh regarding Ajit Pawar plane accident
Rajya Sabha Election: महाराष्ट्रातील ७ जागांसह देशभरातील ३७ राज्यसभा जागांसाठी निवडणूक जाहीर; 'हे' फायर ब्रँड खासदार पुन्हा येणार का?

रोहित पवारांचा आरोप काय?

याप्रकरणात श्वेता सिंह या कोण आहेत? याचा थोडासा अभ्यास करावा. थोडक्यात तुम्हाला सांगतो की, या आपल्या महाराष्ट्राच्या सुनबाई होत्या, आता नाहीत. या डीजीसीएमध्ये काम करतात. फार मोठ्या कुटुंबात त्यांचं लग्न झालेलं होतं, जो सत्तेत पक्ष आहे मोठा, त्या कुटुंबाशी निगडीत या श्वेता सिंह होत्या. या कुटुंबात फार भावनिक गोष्ट झाली त्याचा आपण कधीच विचार करु शकत नाही. याचा अंदाज तुम्हाला आहे.

या श्वेता सिंह आज डीजीसीएमध्ये बसून त्यांच्या कॉन्ट्ॅक्टचा वापर करुन फार मोठं रॅकेट चावलतात. अजित पवारांच्या अपघाताच्या चौकशीच्या एजन्सीमध्ये ज्या अपूर्वा अगरवाल नावाच्या महिला आहेत, त्या पूर्वी जेटएअरवेजमध्ये काम करत होत्या. त्यांच्यासह इतर सदस्यांना लेअरजेट विमान नेमकं कसं असतं हेच माहिती नाही. त्यांना या समितीत श्वेता सिंह यांनी टाकलं असं आमचं मत आहे. अजित पवारांच्या अपघाताची चौकशी सुरु असताना या श्वेता सिंह यांना डीजीसीएमध्ये ठेवू नका अशी आमची मागणी आहे. कारण यांचा संपर्क फार मोठ्या स्तरावर पोहोचलेला आहे.

Rohit Pawar allegations on Shweta Singh regarding Ajit Pawar plane accident
Video: फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉ यांचा मुंबईत फिटनेस मंत्र! परदेश दौऱ्यातही नियमांशी तडजोड नाही; मुंबईकरांची जिंकली मनं

कोण आहेत श्वेता सिंह?

श्वेता सिंह या माजी कमर्शिअल पायलट असून सध्या त्या डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA) अर्थात नागरी विमान वाहतूक महासंचालनालयात चिफ फ्लाईट ऑपरेशन्स इन्स्प्टेक्टर म्हणून कार्यरत आहेत. उड्डाण ऑपरेशन्स, नियमन, देखरेख आणि लेखापरीक्षण, उड्डाण सुरक्षा आणि जोखीम व्यवस्थापन, अपघात आणि दुर्घटनेचा तपास या क्षेत्रात त्यांचा मोठा अनुभव आहे. विमान वाहतूक उद्योगाबद्दल विश्लेषणात्मक, संघटनात्मक आणि समस्या सोडवण्याचं कौशल्य त्यांच्यामध्ये असून त्यांनी सुव्यवस्थित ऑपरेशनल प्रक्रिया तयार केल्या आहेत. USOAP ऑडिट आणि FAA आंतरराष्ट्रीय ऑडिटची त्यांना सखोल ज्ञान असल्याचं त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाईलवरुन कळते.

Rohit Pawar allegations on Shweta Singh regarding Ajit Pawar plane accident
Ajit Pawar Death: अजितदादांचा अपघात की घात? रोहित पवार आज नवे पुरावे देणार; Black Box बाबत गोप्यस्फोट करणार?

राजकीय कनेक्शन काय?

श्वेता सिंह या भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या सूनबाई होत्या. प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र राहुल महाजन यांच्याशी श्वेता सिंह यांनी लग्न केलं होतं. लग्नानंतर काही दिवसांतच घरगुती हिंसाचाराचे आरोप त्यांनी महाजन कुटुंबावर केले होते. पुढे लग्नानंतर केवळ वर्षभरातच ते या नात्यातून वेगळे झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com