अडीच वर्षे हल्लाबोल केल्याचे बक्षीस पडळकरांना मिळण्याची चिन्हे!

Gopichand Padalkar : नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आणि शपथविधी कार्यक्रम १२ किंवा १३ जुलै रोजी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Gopichand Padalkar Latest News
Gopichand Padalkar Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devndra Fadnavis) यांच्या नेतृत्वातील सरकारने काल (ता.4 जुलै) बहुमत चाचणी पूर्ण केल्याने आता नव्या मंत्रिमंडळाला विस्ताराचे वेध लागले आहेत. या मंत्रीमंडळात कुणाला मंत्रीपद भेटणार याबाबतची उत्सुकता लागली आहे.

दरम्यान भाजपचे (BJP) आक्रमक नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांना गेली अडीच वर्षे केलेल्या कामाचं बक्षीस म्हणून त्यांना नव्या सरकारमध्ये मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आणि शपथविधी कार्यक्रम १२ किंवा १३ जुलै रोजी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Gopichand Padalkar Latest Marathi News)

Gopichand Padalkar Latest News
मातोश्री'च्या आशीर्वादाने आमदार निवडून आले असते तर पूजा केली असती

गोपीचंद पडळकर हे भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू असून त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या काळात सरकारवर टीकेची झोड उठवत सरकारला चांगलेच जेरीस आणले होते. यामध्ये खासकरून पडळकरांच्या टार्गेटवर राष्ट्रवादी आणि राष्टवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार राहिले आहेत. ते अनेकदा त्यांच्यावर आक्रमकपणे टीका करतात. यामुळे त्यांनाही अनेकदा राष्ट्रवादीच्या रोषाला सोमोरे जावे लागले.

पडळकरांनी राज्य लोकसेवा आयोगाच्या विद्यार्थ्यांसाठी पुण्यात केलेले त्यांचे आंदोलन चांगलेच गाजले होते. तर राज्यभर गाजलेल्या एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात त्यांनी सदाभाऊ खोत यांच्या साथीने मुंबईतील आझाद मैदावर मुक्काम ठोकत या आंदोलनाचा भडका अजूनच वाढवला होता. यामुळे महाविकास आघाडी सरकार बॅकफुटवर गेले आणि महाविकास आघाडी सरकारला कर्मचाऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला होता. शिवाय कुठल्याही आंदोलनात ते आक्रमकपणे विरोधकांना अंगावर घेतात. त्यांच्या या आक्रमकतेचा फायदा अनेकदा पक्षाला झाला आहे. त्यामुळे त्यांच्या कामाची दखल भाजप अर्थात फडणवीस घेतील आणि त्यांची या नव्या मंत्रीमंडळामध्ये वर्णी लागेल, असे बोलले जात आहे. शिवाय मंत्र्याच्या संभाव्य यादीमध्येही त्यांच्या नावाचा उल्लेख असल्याने पडळकरांना मंत्री पदाचे बक्षीस मिळेल, असे बोलले जात आहे.

Gopichand Padalkar Latest News
20 जून रोजी अस काय घडलं की ज्यामुळे एकनाथ शिंदेंची सटकली आणि ठाकरेंची खुर्ची गेली...

दरम्यान ११ जुलैला सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आणि त्यानंतर १८ जुलैपासून पावसाळी अधिवेशन होणार आहे. या दोन्हीतील मुहूर्त साधत अधिवेशनापूर्वी नव्या मंत्र्यांना पदभार दिला जाऊ शकतो. नव्या मंत्रिमंडळात भाजपचे २५ ते ३० मंत्री, तर एकनाथ शिंदे गटाचे १४ ते १५ मंत्री असतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. संभाव्य मंत्र्यांची नावे देखील समोर येत आहेत.

शिंदे गटातून संभाव्य मंत्री

अनिल बाबर, शंभुराज देसाई, संजय शिरसाट, तानाजी सावंत, दीपक केसरकर, गुलाबराव पाटील, दादा भुसे, सदा सरवणकर, प्रकाश अविटकर, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, शहाजी बापू पाटील, बच्चू कडू, भरत गोगावले, राजेंद्र यड्रावकर, लता सोनवणे, मंजुळा गावित.

भाजपचे संभाव्य मंत्री..

गणेश नाईक, रवींद्र चव्हाण, प्रवीण दरेकर, नितेश राणे, आशिष शेलार, संजय कुटे, मदन येरावार, सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, संदीप धुर्वे, रणजित सावरकर, अतुल सावे, संभाजी निलंगेकर, राणा जगजीतसिंह पाटील, मेघना बोर्डीकर, चंद्रकांत पाटील, राहुल कुल, महेश लांडगे, जयकुमार गोरे, राम सातपुते, रणजित मोहिते पाटील, सुभाष देशमुख, विजय देशमुख, गोपीचंद पडळकर, गिरीश महाजन, जयकुमार रावल, राम शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील, देवयानी फरांदे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com