मातोश्री'च्या आशीर्वादाने आमदार निवडून आले असते तर पूजा केली असती

Narendra Bhondekar|Shivsena|Sanjay Raut : अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेना आणि शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
MP Sanjay Raut and MLA Narendra Bhondekar Latest News
MP Sanjay Raut and MLA Narendra Bhondekar Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

भंडारा ः Narendra Bhondekar : शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ बघायला मिळाली. यामुळे शिवसेना (Shivsena) पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. मात्र, बंडखोरी केल्यामुळे शिंदे गट आणि शिवसेना नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी चांगल्याच झडत आहेत.

दरम्यान यामध्ये अपक्ष आमदारांनीही उडी घेतली असून भंडाऱ्याचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर (Narendra Bhondekar) यांनी 'मातोश्री'च्या आशिर्वादाने आमदार निवडून आले असते तर सर्वच आमदार निवडुन आले असते, अशी शिवसेनेवर टीका केली तर 'सामना'मधून करण्यात आलेल्या टीकेला प्रत्युत्तर देत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरही निशाणा साधला.

MP Sanjay Raut and MLA Narendra Bhondekar Latest News
शिवसेना आमची आणि लवकरच 'धनुष्य बाण'ही : बंडखोर आमदार गायकवाडांनी ठाकरेंना ललकारले

अपक्ष आमदार भोंडेकर यांनी शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांना समर्थन दिले होते. त्यानंतर ते आपल्या मतदारसंघात परतले आहेत. यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. राज्यातील या सत्यानाट्यामध्ये जवळजवळ एक महिना गेल्याने आपण जनतेचे काम करू शकलो नाही याची खंत वाटते. मात्र, जिल्ह्यासाठी येणारे प्रोजेक्ट जनतेसाठी आता फायदेशीर ठरणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच राऊतांनी मातोश्री'मुळे बंडखोर आमदार निवडून आल्याच्या वक्तव्यावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आणि आम्ही जनतेच्या आशीर्वादामुळे निवडून आल्याचे त्यांनी राऊतांना सुनावले.

MP Sanjay Raut and MLA Narendra Bhondekar Latest News
पाटणमध्ये ना पक्ष, ना व्होट बँक : शंभुराजे बंडखोरीनंतरही 2024 साठी निश्चिंत आहेत

भोंडेकर म्हणाले, शेवटी काम करणारेच लोक निवडून येत असतात. लोक काम करणाऱ्यांच्याच बाजूने उभे असतात. त्यामुळे ज्यांना आम्हाला निवडून आल्याचे क्रेडीट घ्यायचे असेल त्यांनी ते खुशाल घ्यावे. मात्र जर मातोश्रीच्या आशीर्वादाने आमदार निवडून आले असते तर मातोश्री'ची पूजा करून सर्वच आमदार निवडून आले असते, असा खोचक टोला त्यांनी राऊतांना लगावला.

MP Sanjay Raut and MLA Narendra Bhondekar Latest News
शिंदे-फडणवीसांच्या मंत्रिमंडळाला विस्ताराचे वेध; मुहूर्तही ठरला!

दरम्यान, त्यांनी आजच्या सामना'च्या संपादकीय लेखाची त्यांनी खिल्ली उडवली. आजच्या संपादकीय लेखामध्ये एकनाथ शिंदेच्या बंडाला स्वातंत्र्याचे बंड न म्हणता खाजगी बंड म्हटले आहे. यावर सामनाला कोण लिहितो हे सर्व जगाला माहीत आहे, असा उपरोधक टोलाही त्यांनी राऊतांना लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com