
Mumbai News : दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू होत आहेत. यापार्श्वभूमीवर या दोन्ही परीक्षेत बुरखा घालून परीक्षा देण्यास परवानगी नाकारण्यात यावी, अशी मागणी भाजप नेते मंत्री नीतेश राणे यांनी केली. यावर 'एमआयएम'चे राष्ट्रीय प्रवक्त वारीस पठाण यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते.
यावरून मंत्री नीतेश राणे भडकले असून, 'हा विषय माझा, शिक्षण मंत्री आणि आमच्या सरकारचा आहे. उगाच अशा हौशा-नौशा-गौशांना कशाला उत्तर देत राहू', असे टोला लगावला.
भाजप (BJP) मंत्री नीतेश राणे हिंदुत्वाच्या मुद्यावर नेहमीच आक्रमक असतात. महायुतीच्या सत्तेत येण्यापूर्वी आणि आमदार असताना त्यांनी राज्यात अनेक भागात सकल हिंदू मोर्चांना हजेरी लावत मुस्लिमांविरोधात आक्रमक विधान केली. आता महायुती राज्याच्या सत्तेत आहे. यावर मंत्री झालेले राणे यांचे हिंदुत्व अधिकच आक्रमक झाले आहे. त्यांनी आता इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेत बुरखा घालून परीक्षा देण्यास परवानगी नाकारण्यात यावी, अशी मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीवर वाद उफळला आहे.
मंत्री नीतेश राणे यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांना अधिकृत पत्र देत या मुद्याकडे लक्ष वेधले. मंत्री भुसे यांनी देखील त्यावर कॉपीमुक्त परीक्षा हे शिक्षण विभागाचे अभियान असणार आहे. बुरखा घातलेला असू दे किंवा विना बुरखा घातलेला असू दे, कोणी विद्यार्थी कॉपी करणार नाही, याची दक्षता घेतली, जाईल अशी प्रतिक्रिया दिली.
तथापि मंत्री राणे यांच्या या भूमिकेवर एमआयएमचे राष्ट्रीय प्रवक्ते वारीस पठाण चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी नीतेश राणे नेहमची विषारी भाषा करतात. ते आता मंत्री झाले आहेत. त्यांनी आता सुधारले पाहिजे. त्याऐवजी मुस्लिमांना मारण्याची, धर्मस्थळांमध्ये घुसण्याची भाषा नेहमी असते. भाजपने यासाठी त्यांनी मंत्रीपद देऊन गौरव केला आहे. आता तरी त्यांनी अशी भाषा थांबवली पाहिजे, असा जोरदार प्रत्युत्तर दिले.
नीतेश राणे यांनी पुन्हा एकदा याच मुद्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 'कुठेही काॅपी होता कामा नये, पारदर्शकता आली पाहिजे. सगळ्या नियम लागू असले पाहिजे. जो नियम एका धर्माला लागू होतो, तोच इतरांना लागू असला पाहिजे. शिक्षणमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली असली, तर काॅपी होऊन, अन्य विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव होऊ नये, अशी भूमिका घेतली असल्यास स्वागतच आहे. आम्ही सरकारमध्ये आहोत. आम्ही एक-दुसऱ्यावर तलावर काढणार नाही. काही सूचना असतील, सल्ले असतील, तर ते एकमेकांना देण्याचा अधिकार आहे. दादा भुसेंनी बंदरे खाते संभाळले आहे. त्यांनी त्याबाबत काही सूचना केल्यास, मी निश्चित, त्याचं स्वागत करेल. परीक्षेत पारदर्शकता यावी, भेदभाव होऊ या दृष्टीतून केलेले विधान होते', असे सांगितले.
वारीस पठाण यांनी केलेल्या टीकेकडे लक्ष वेधल्यावर मंत्री राणे म्हणाले, "कोण काय बोलतो, हे सर्व गौण आहे. मी शिक्षण मंत्र्यांना पत्र दिल होत. कॉपी मुक्त परीक्षा घेण्याची तयारी असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं आहे". माझा मूळ उद्देश हाच होता. आणि हा विषय माझा, शिक्षण मंत्री आणि आमच्या सरकारचा आहे. उगाच अशा हौशा-नौशा-गौशांना कशाला उत्तर देत राहू, असे म्हणत फटाकरले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.