सिंधुदुर्ग : भाजपचे आमदार नीतेश राणे (nitesh rane) यांच्या अटकपूर्व जामीनावर आज निर्णय होणार आहे. त्यांना अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तर दुसरीकडे आज या प्रकरणाच्या केंद्रस्थानी असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेची (Sindhudurg District Central Co-operative Bank Election) निवडणुक होत आहे. बुधवारी रात्रीपासून केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचा मुक्काम कणकवलीच्या ओम गणेश बंगल्यावर आहे.
निवडणुकीच्या निमित्ताने आज सकाळपासूनच नारायण राणे यांच्या ओमगणेश बंगल्यात हालचालींना वेग आला आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक पदाधिकारी नारायण राणे यांच्या बंगल्यावर उपस्थित आहेत. नारायण राणे सोबत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक होत असल्याचे सुत्रांनी सांगितलं.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पॅनलसमोर महाविकास आघाडीने (Maha vikas Aghadi) आव्हान उभे केले आहे. तर कुणीही कितीही प्रयत्न केला तरी या निवडणुकीत आपलेच पॅनल विजयी होणार, असा विश्वास राणे गटाला आहे. तर मेडिकल कॉलेज आणि बलेरो गाड्यांसाठी घेतलेले कर्ज बुडवण्यासाठी राणे यांना बँकेवर ताबा हवा असल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे. या निवडणुकीकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागले आहे. या संघर्षात कोण बाजी मारते त्याचा निर्णय 31 डिसेंबरला होईल.
नीतेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनावर न्यायालय आज निर्णय देणार आहे. नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिनावर बुधवारी सुनावणी पूर्ण झाली. न्यायालयात दोन्ही वकिलांमध्ये जोरदार खडजंगी झाली. सरकारी वकील जाणीवपूर्वक वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप नीतेश राणे यांच्या वकिलांनी केला. तर जबाबदार केंद्रीय मंत्री नारायण राणे भर पत्रकार परिषदेत सांगतात लक्षात ठेवा, केंद्रात आमचं सरकार आहे. ही धमकी नाही तर काय? असा सवाल सरकारी वकीलांनी केला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.