Ramdas Athawale On Ajit Pawar : ''...म्हणून शिंदे - फडणवीस सरकारमध्ये अजित पवारांना उपमुख्यमंत्री केलं!''; आठवलेंचा मिश्किल टोला

Maharashtra Politics : ''...म्हणून पवारांनी एनडीएमध्ये यावं!''
Minister Ramdas Athawale
Minister Ramdas Athawalesarkarnama
Published on
Updated on

Mumbai : केंद्रीय गृहमंत्री रामदास आठवले हे त्यांच्या शेरोशायरीतून विरोधकांना चिमटे काढत असतात. याचवेळी ते सरकारला सल्ले द्यायलाही मागेपुढे पाहत नाही. आता आठवले यांनी शिंदे - फडणवीस सरकारमधील अजित पवारांच्या 'एन्ट्री'वरदेखील मिश्किल टिप्पणी केली आहे.

केंद्रीय मंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. आठवले म्हणाले, युती सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर अजित पवारां(Ajit Pawar)चा चेहरा फुललेला आहे. आणि आता तो अधिक फुलणार आहे. चेहरा फुलण्यासाठीच त्यांना उपमुख्यमंत्री केलं आहे.

Minister Ramdas Athawale
Sanjay Raut On Ajit Pawar: निधीवाटपातील गोंधळ महाराष्ट्राचे राजकारण नासवणारे; संजय राऊतांचा अजित पवारांवर घणाघात

...म्हणून पवारांनी एनडीएमध्ये यावं

शरद पवारयांनी एनडीएमध्ये यायला हवं. सगळे आमदार इकडे आलेत, त्यामुळे शरद पवार यांनी तिथे राहून काही फायदा नाही असा सल्लाही आठवलेंनी पवारांना दिला. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत आम्हाला 350 पेक्षा जास्त जागा मिळणार असून नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार आहे. पण विरोधकांनी त्यांच्या नेत्याचं नाव सांगावं असा टोलाही आठवलेंनी विरोधकांना लगावला. महाराष्ट्रामध्ये सह्याद्री आहे, डोंगर आहेत. त्या डोंगराच्या खाली वस्त्या आहेत.त्याबाबत सर्वेक्षण करावं, यासाठी समिती नेमावी अशी मागणी केली. त्यांचं पुनर्वसन करावं अशी मागणीही आठवलेंनी केली.

अजितदादा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) सभागृहात आहेत. त्यामुळे त्यांची भेट झाली नाही. नंतर त्यांना भेटेन. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो.यावेळी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलणं झालं. तसेच आरपीआय़ पक्ष भाजपसोबत आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात आमचाही विचार व्हावा असेही रामदास आठवले यावेळी म्हणाले. आम्हाला शब्द दिला होता, त्यामुळे विस्तारात आम्हाला पण एक मंत्रिपद द्यावं अशी मागणी केली. महामंडळाबाबत देखील आम्हाला एखादं पद द्यावं असं सांगितलं. फडणवीसांनी लवकर मंत्रिमंडळ विस्तार करू म्हटलं.

Minister Ramdas Athawale
Shinde Fadnavis Digital Advertisement : सरकार चालवायचे तिघांनी, जाहिरातीत मिरवायचं मात्र दोघांनी ; अजितदादांचं काय ?

राज्यात दलितांवरील अत्याचार वाढले आहेत.याबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी एक बैठक बोलवून अत्याचार कसे रोखतील याबाबत चर्चा करावी.यासंदर्भात देखील त्यांना पत्र लिहिलं आहे. अॅट्रोसिटी ऍक्ट अंतर्गत ज्यांनी कमान तोडली होती, त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. नव्याने पुन्हा कमान बांधण्यात येणार असल्याचेही आठवलेंनी सांगितले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com