Shinde Fadnavis Digital Advertisement : सरकार चालवायचे तिघांनी, जाहिरातीत मिरवायचं मात्र दोघांनी ; अजितदादांचं काय ?

Maharashtra Politics : जाहिरातीत अजित पवार कुठेही दिसत नाहीत.
Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar
Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये दोन जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारही सहभागी झाले आहेत. राज्य सरकारने आपल्या कामांचा धडाका लावला आहे. सध्याच्या शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा कामाचा आढावा घेणारी डिजिटल जाहिरातीतून अजित पवारांनी डावलण्यात आली आहे.

यावरुन राष्ट्रवादीचे आमदार (शरद पवार गट) रोहित पवार यांनी काकांना (अजित पवार) डिवचत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांना चिमटा काढला आहे. रोहित पवारांनी “सरकार चालवायचं तिघांनी, जाहिरातीत मिरवायचं मात्र दोघांनी!” असं खोचक टि्वट केले आहे.

शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या कामाचा आढावा घेणारी ही डिजिटल जाहीरात जुहु चौपाटीवर झळकली आहे. यात सरकारच्या वर्षभरातील विकास कामे, विविध योजना या विषयी माहिती दिली आहे. या जाहिरातीत अजित पवार कुठेही दिसत नाहीत. रोहित पवार यांनी हा व्हिडिओ आपल्या टि्वटर हॅडलवरुन शेअर केला आहे. त्यांचे हे टि्वट रिटि्वट होत आहे. नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar
NDRF News Update: एनडीआरएफ बेस कॅम्पबाबत अजित पवारांची मोठी घोषणा ; रायगडमध्ये...

रस्त्याच्या कडेला या जाहिरातीचा डिजीटल बोर्ड दिसत आहे. यावर शिंदे-फडणवीस सरकारची जाहिरात दाखवण्यात येत आहेत. मात्र यामध्ये सत्तेमधील शिंदे-फडणवीस हे दोघेच दिसत असल्याने अजित पवारांचे काय ? असा प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केला आहे.

"आपला दावाखाना" या सरकारी उपक्रमासह इतरही अनेक सरकारकडून देण्यात येणाऱ्या जाहीराती या बोर्डवर दिसत आहेत. मात्र या जाहीरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणीस हे दोघेच दिसतात. उपमुख्यमंत्री अजित पवारांना या जाहिरातींमधून वगळल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com