Danve On Police Recruitment: ... तर गुंडांना पोलिसांचा वचक कसा राहिल? कंत्राटी पोलीस भरतीप्रकरणी दानवे आक्रमक

Mumbai Police News : राज्याच्या गृहविभागाने मुंबई पोलीस दलात तीन हजार पदाची कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय जाहीर केला
Police Recruitment
Police RecruitmentSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Polics : राज्याच्या गृहविभागाने मुंबई पोलीस दलात कंत्राटी पद्धतीने पोलीस भरती करण्याच्या निर्णयाविरोधात विरोधी पक्षांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. अधिवेशनातही याचे पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. पोलीस दलात कंत्राटी पद्धतीने भरती केल्यास गुंडांना पोलिसांचा वचक कसा राहिल, असा प्रश्न विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला. याचवेळी हा निर्णय त्वरीत मागे घ्यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. त्यानंतर, सरकारने यावर निवेदन सादर करावे, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ . नीलम गोऱ्हे यांनी दिले.

राज्याच्या गृहविभागाने मुंबई पोलीस दलात तीन हजार पदाची कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय जाहीर केला. पण कंत्राटी पोलीस भरतीचा निर्णय धोकादायक आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तो त्वरीत मागे घ्यावा. पोलीस हे सरकारच्या अखत्यारीतच असले पाहिजेत, अशी आग्रही मागणीही यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.

Police Recruitment
MP Hemant Patil Slaps Tehsildar: एका मिनिटात तुमच्या अंगातील मस्ती उतरवीन ; शिवसेना खासदाराने तहसीलदाराला झाप झाप झापलं..

जगात मुंबई पोलिसांची तुलना स्कॉटलंड पोलिसांशी केली जाते. पण गृह विभागाने घेतलेला निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे. कंत्राटी पद्धतीने पोलिसांची भरती करून पोलीस विभागाची पत कमी  करण्याचे काम सरकारने  केल्याची टिका ही दानवेंनी यावेळी केली. तसेच, अशा निर्णयामुळे पोलिसांचे मनोबल कमी होते, निर्णय घेण्यापूर्वीच गृहविभागाने करायला हवा होता असही दानवे यांनी केली.

तर, मुंबई पोलिसांच्याच नव्हे तर राज्याच्या दृष्टीनेही हा प्रश्न महत्वाचा आहे. ११ महिन्यांसाठी अशी पोलिसांची भरती केली तर गुंडाच्या नजरेत पोलिसांचा धाक कसा राहिल? खाकी वर्दीची जरब कशी राहिल ? असे प्रश्न काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी उपस्थित केले.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com