
Sanjay Raut Replied Narayan Rane : 'आम्ही त्यांच्यासारखे डरपोक आणि पळपुटे नाहीत. ईडीची नोटीस येताच पक्ष बदलणारे आम्ही नाही. मी माझ्या पक्षासाठी हिमतीने जेलमध्ये गेलोय, तुमच्या सारखा पळून नाही गेलो. नामर्द नाहीओत आम्ही. बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. तुमच्या हातात कायदा आहे का मला जेलमध्ये टाकायला. तुम्ही कायद्याचे बाप झालात का, अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या इशाऱ्याला उत्तर दिलं आहे.इतकेच नव्हे तर, नारायण राणेंची आर्थिक प्रकरणे बाहेर काढली तर ते ५० वर्षे जेलमधून बाहेर येणार नाहीत असंही राऊत यांनी म्हटलं आहे.
नारायण राणे यांनी गुरुवारी एका कार्यक्रमात बोलताना संजय राऊत यांना इशारा दिला होता. २६ डिसेंबरला दैनिक सामनाच्या अग्रलेखात नारायण राणें यांच्याबाबत काही उल्लेख करण्यात आले होते. ''मी 26 डिसेंबरच्या सामनाच्या अग्रलेखाचं कात्रण जपून ठेवलं आहे. संजय राऊत 100 दिवस जेलमध्ये जाऊन बाहेर आलाय ना. त्याला पुन्हा जेलवारी घडवणार ," असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी सिंधुदुर्गातील एका कार्यक्रमात बोलताना दिला आहे. राणे कणकवली पर्यटन महोत्सव 2023 बोलत होते. या अग्रलेखावरुन राणेंनी राऊतांना पुन्हा तुरुंगात टाकण्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर राऊतांनी राणेंना उत्तर दिलं आहे.
नारायण राणे यांच्या इशाऱ्यानंतर संजय राऊत यांनीदेखील त्यांच्या इशाऱ्याला उत्तर दिलं आहे. ' हिमतीच्या, धाडसाच्या गोष्टी कोणी बोलाव्यात, आतापर्यंत मी त्यांच्यावर काहीच बोललो नाही, एकेकाळी ते आमचे सहकारी होते. धमक्या देऊ नका, धमक्या देणार असाल तर राजवस्त्र बाजूला काढा आणि या. मग दाखवतो मी, झाकली मुठ सव्वा लाखाची. मी हिमतीने माझ्या पक्षासाठी जेलमध्ये गेलोय, तुमच्यासारखं ईडीची नोटीस आली म्हणून पळून नाही गेलो मी, अशा शब्दांत करत राऊत यांनी राणेंना उत्तर दिलं आहे. मला कोण काय बोलतय याच्या सर्व नोंदी मी चिफ जस्टिस ऑफ इंडिया यांना पाठवली आहेत. असंही राऊत यांनी म्हटलं आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.