Maharashtra Police: तर पोलिसांनाच संरक्षण द्यावे लागेल.. अजित पवारांनी पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांकडे वेधले लक्ष

राज्यातील नागरिकांच्या संरक्षणासाठी २४ तास कर्तव्यावर असलेल्या पोलिसांवर अलीकडच्या काळात हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत.
Budget Session | Maharashtra Police
Budget Session | Maharashtra PoliceSarkarnama
Published on
Updated on

Budget Session : राज्यातील नागरिकांच्या संरक्षणासाठी २४ तास कर्तव्यावर असलेल्या पोलिसांवर अलीकडच्या काळात हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. पोलिसांवरच असे हल्ले होत राहिले तर एक दिवस पोलिसांनाच संरक्षण देण्याची वेळ येईल, अशी चिंता विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज सभागृहात व्यक्त केली. तसेच, पोलिसांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.

राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अजित पवार बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्याची काही उदाहरणे देखील दिली. अलीकडच्या तीन महिन्यात पोलिसांवरही हल्ल्याच्या तीस घटना घडल्या आहेत. पोलिसांच्या अंगावरच गाडी घातली जाते, गाडीसोबतच त्यांना फरफटत नेलं जातं.

Budget Session | Maharashtra Police
US-Russia Conflicts: विमान-ड्रोनची धडक; रशिया-अमेरिकेतील तणाव वाढला

मुंबईतील किडवई मार्गावरील रफी अहमद पोलीस ठाण्यात एका आरोपीने दोन पोलिस कर्मचाऱ्यांनाच धक्काबुक्की केली. योगेश खरात या पोलीस उपनिरीक्षकाच्या हाताला चावा घेतला. काळवादेवी वाहतूक पोलीस स्टेशनमध्ये पोलीस हवालदार योगेश जाधव हे कर्तव्यावर असताना एका दुचाकीस्वाराला थांबण्याचा इशारा केला. पण त्याने जाधव यांना गाडीसोबतच फरफटत नेलं, यात ते गंभीर जखमी झाले.

त्यानंतर वाडी बंदर जक्शन येथे पोलीस कर्मचारी सत्यवान सोनावने कर्तव्यावर असातना दुचाकीवरुन हेल्मेट न घालता जाणाऱ्यांना थांबवलं असता त्यांनीही सोनावने यांना धडक दिली. यात सोनावनेंचा हात फ्रॅक्चर झाला.देवनार पोलीस ठाण्याचे संदीप मोहिते झोपडपट्टीत आरोपींना पकडायला गेले असताना त्यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्यांच्या डोळ्यांना आणि हातांना जबर दुखापत झाली. अशा घटना पोलिसांसोबतच घडत आहेत. आता

नागरिकांचे संरक्षण करणाऱ्यांवरच असे हल्ले होत आहेत. असे हल्ले होत राहिले तर त्यांनाच संरक्षण देण्याची वेळ येईल. पण असे हल्ले रोखण्यासाठी पोलिसांना वॉकीटॉकी, मोटारसायकली पुरवण्याची आवश्यकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com