Uddhav Thackeray News: ...तर मुख्यमंत्री म्हणून पुन्हा उध्दव ठाकरेंनाच पसंती! 'सी व्होटर'च्या सर्व्हेत नेमकं काय?

Survey of C Voter: एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतरही स्थानिक पातळीवर उद्धव ठाकरेंना सहानुभूती....
Uddhav Thackeray News
Uddhav Thackeray NewsSarkarnama

Mumbai News: गेल्या काही दिवसांत राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांचं वारं वाहू लागलं आहे. एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. याचवेळी अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले आहेत. तर आघाडीतील नेतेमंडळींकडूनही मुख्यमंत्रीपदाबाबत दावे प्रतिदावे सुरु आहे. याचवेळी सध्याचं शिंदे फडणवीस सरकारला पायउतार व्हावे लागले तर महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री म्हणून अनेक नावांची चर्चा सुरु आहे. पण नवीन मुख्यमंत्री म्हणून जनतेची पसंती उध्दव ठाकरेंनाच (Uddhav Thackeray) असल्याचं समोर एका सर्व्हेक्षणात समोर आलं आहे.

उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वाला आव्हान देत एकनाथ शिंदे यांनी आमदार खासदारांसह बंडखोरी केली होती. यानंतर भाजपच्या सोबत सत्ता स्थापन केल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून ठाकरे शिंदे गटातून विस्तवही जात नाही. तसेच राज्यातील या सत्तासंघर्षावर न्यायालयीन सुनावणी पूर्ण झाली असून लवकरच निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. यात शिंदेसह १६ आमदारांवर अपात्र झाले तर राजकीय समीकरणं देखील बदलण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Uddhav Thackeray News
Palghar Politics: ठाकरे गटातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर; पंचायत समिती उपसभापतींवर जीवघेणा हल्ला...

याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची धोक्यात येण्याचीही शक्यता राजकीय वर्तुळात सुरु आहे. याचदरम्यान, एकनाथ शिंदे पायउतार झाले तर महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री कोण असणार याविषयी तर्कवितर्कांना लढवले जात आहे. याचवेळी सी- व्होटर संस्थेनं केलेल्या सर्व्हेक्षणात महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यापेक्षा उध्दव ठाकरेंना अधिक पसंती मिळाल्याचं समोर आलं आहे. सी-व्होटरनं हे सर्वेक्षण 24 एप्रिल ते बुधवार (26 एप्रिल) या कालावधीत करण्यात आले.

Uddhav Thackeray News
Mumbai University : सिनेट निवडणूक कधी ? ; वातावरण तापलं, ठाकरे गटाचे पदाधिकारी कुलगुरुंच्या भेटीला..

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतरही स्थानिक पातळीवर उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळत असल्याचं त्यांच्या सभा, दौरे, भेटीगाठी आंदोलनातून अनेकदा समोर आलं आहे. आता सी-व्होटरनं केलेल्या सर्व्हेक्षणातूनही हीच बाब अधोरेखित होत आहे. या सर्वेक्षणात जनतेनं देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यापेक्षा उद्धव ठाकरेंच्या नावाला महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री म्हणून अधिक पसंती दिल्याचं समोर आलं आहे.

सी व्होटरच्या सर्व्हेत देवेंद्र फडणवीस यांना 26 टक्के,अजित पवारांना 11 टक्के, उद्धव ठाकरेंना 28 टक्के जनतेने पसंती दिली आहे. तर 35 टक्के लोकांनी माहित नसल्याचं म्हटलं आहे.

(Edied By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com