Anjali Damania : वाल्मिक कराडबरोबर 'तो' नेता कोण? सोशल मीडियावर फोटो 'शेअर'; अंजली दमानियांची 'मोठी' मागणी

Anjali Damania Beed Santosh Deshmukh murder case Walmik Karad Laxman Hake social media : सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी त्यांच्या 'एक्स' खात्यावर वाल्मिक कराडचा 'तो' फोटो शेअर करून खळबळ उडवून दिली आहे.
Anjali Damania
Anjali DamaniaSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी 'एक्स' या समाज माध्यमावरील त्यांच्या खात्यावर एक फोटो शेअर करून खळबळ उडवून दिली आहे.

वाल्मिक कराड आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा एकत्र जेवतानाचा हा फोटो असल्याचा दावा करत, तो मला एका व्यक्तीने पाठवल्याने फोटो पोस्ट करत आहे, असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.

संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराड हा 'प्लॅनर' असल्याचा आरोप होत आहे. वाल्मिक कराड हा सध्या खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी असून, तो पोलिस कोठडीत आहे. संतोष देशमुख हत्येप्रकरणामुळे बीडमधील गुन्हेगारी राज्यात चर्चेत आली आहे. यावर अंजली दमानिया आणि भाजप (BJP) आमदार सुरेश धस सातत्याने आवाज उठवत आहेत.

Anjali Damania
Jitendra Awhad : ''युद्धावेळी'च अजितदादा-सुरेश धस भेट, ...तर संशय येतोच'; जितेंद्र आव्हाडांनी डिवचलं

बीडमधील हत्याप्रकरणामुळे मराठा (Maratha) आणि ओबीसी, असा काहीसा संघर्ष पेटल्याचे दिसते. अंजली दमानिया यांनी सातत्याने धनंजय मुंडे यांच्या मंत्रि‍पदाचा राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. यातून ओबीसी नेत्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची बाजू लावून धरत, त्यांना अडकवले जात असल्याचा आरोप केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून अंजली दमानिया यांनी समाज माध्यमांवर फोटो शेअर करून निरूत्तर केलं आहे.

Anjali Damania
Delhi Assembly Election : काँग्रेस एकाकी; सर्वच प्रमुख मित्रपक्षांनी सोडली साथ, कोणती चूक नडली?

अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराड आणि लक्ष्मण हाके यांचा फोटो शेअर करण्यापूर्वी आणखी एक पोस्ट शेअर केली. यात बीडमधील अनेक अवैध धंद्यामध्ये वाल्मिक कराड असल्याचा आरोप केला. वाल्मिक कराड याच्या वाईन शाॅपबाबत देखील अनेक पुरावे अंजली दमानिया यांनी समोर आणले आहेत.

हाकेंनी मुंडे अन् कराडची कशी घेतली बाजू

पुणे जिल्ह्यातील राजगुरूमध्ये गिरी गोसावी समाजाच्या चिमुरडीची हत्या झाली. तिथं शरद पवार भेटायला गेले नाहीत. अंजली दमानिया मुंबईहून बीडमध्ये आल्या. त्यांनीही राजगुरूनगरमध्ये जावेसे वाटले नाही, असे म्हणत लक्ष्मण हाके यांनी अंजली दमानिया यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करणारे प्रश्न उपस्थित केले. सर्व काही ठरवून? अंजली दमानिया यांना नेमकी कोण रसद पुरवतं? असा प्रश्न देखील हाकेंनी उपस्थित केले आहेत. या प्रश्नांना प्रत्युत्तर म्हणूनच अंजली दमानिया यांनी कराड आणि हाके यांचा एकत्रित फोटो शेअर केल्याचे म्हटले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com