खार पोलिस ठाण्यात सोमय्यांच्या विरोधात घोषणा देणारे महाडेश्वर पोलिसांच्या जाळ्यात...

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवि राणा यांना खार पोलिसांनी २३ एप्रिल रोजी अटक केली होती. अटकेनंतर रात्री उशिरा सोमय्या हे राणा दांपत्यास भेटायला गेले होते.
Kirit Somaiya-Vishwanath Mahadeshwar
Kirit Somaiya-Vishwanath MahadeshwarSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मुंबईचे माजी महापौर तथा शिवसेना (shivsena) नेते विश्वनाथ महाडेश्वर (Vishwanath Mahadeshwar) यांच्यासह शिवसेनेच्या तीन नगरसेवकांना भारतीय जनता पक्षाचे (BJP) माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणात आज (ता. २५ एप्रिल) अटक करण्यात आली. खार पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सोमय्या यांच्यावर खार पोलिस ठाण्याच्या आवारात हल्ला झाला होता. (Kirit Somaiya attack : Former Shiv Sena mayor Vishwanath Mahadeshwar & Three corporators arrested)

सोमय्यांवरील हल्ला प्रकरणात माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि काही शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी माजी महापौर महाडेश्वर, नगरसेवक हाजी खान, चंद्रशेखर वैगणकर, दिनेश कुबल यांना अटक करण्यात आली आहे.

Kirit Somaiya-Vishwanath Mahadeshwar
हर्षवर्धन पाटलांना आणखी एक धक्का : १५ वर्षांची सत्ता संपुष्टात; भरणे गटाची बाजी!

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवि राणा यांना खार पोलिसांनी २३ एप्रिल रोजी अटक केली होती. त्यादिवशी शिवसेना आणि राणा दांपत्य यांच्यात मोठा संघर्ष झाला होता. अटकेनंतर रात्री उशिरा सोमय्या हे राणा दांपत्यास भेटायला गेले होते. तत्पूर्वी त्यांनी आपण राणा यांना भेटायला जाणार असल्याचे ट्विट केले होते. त्यामुळे खार पोलिस ठाणे परिसरात आपसूकच शिवसैनिकांची गर्दी झाली होती.

Kirit Somaiya-Vishwanath Mahadeshwar
पालिका, ZP निवडणुकीसंदर्भातील सुनावणी पुन्हा पुढे ढकलली; पावसाळ्यानंतरच रंगणार रणसंग्राम

सोमय्या भेटायला आल्यानंतर शिवसैनिकांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली होती. तसेच, ते राणा दांपत्याला भेटून परत जात असताना शिवसैनिकांनी सोमय्या यांच्या गाडीवर चप्पल आणि बाटल्या फेकल्या होत्या. यामध्ये सोमय्यांच्या मोटारीची काच फुटून ते या हल्ल्यात जखमी झाले होते. ही घटना घडली तेव्हा महाडेश्वर हे घटनास्थळी उपस्थित होते. शिवसैनिकांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न सोमय्या यांच्या मोटारचालकाने केल्याचा आरोप माजी महापौर महाडेश्वर यांनी केला होता. त्याबाबतची तक्रार देण्यासाठी महाडेश्वर स्वतः पोलिस ठाण्यात पोचले होते.

Kirit Somaiya-Vishwanath Mahadeshwar
राष्ट्रवादीने कोल्हापुरात कमावले कमी आणि गमावलेच जास्त!

दरम्यान, सोमय्यांवरील हल्ल्याचा भाजपकडून निषेध करण्यात आला होता. तसेच, सोमय्यांचा सहभाग असलेले एक शिष्टमंडळ आज केंद्रीय गृहसचिवांना भेटले आहे. तसेच, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुद्द गृहमंत्री अमित शहा यांना फोन केला आहे. त्यामुळे केंद्र सरकार याप्रकरणी कोणते पाऊल उचलते हे पाहावे लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com