माझं सांगणं फडणवीसांना चांगलंच कळतंय; राऊतांचा इशारा

पण याद राखा, जर आम्ही कोठडीत गेलो तर तुम्हालाही त्याच कोठडीत आणल्याशिवाय राहणार नाही,
bjp-shivsena latest political news
bjp-shivsena latest political news
Published on
Updated on

नवी दिल्ली : 'भाजपशी (BJP) युती तोडल्यानंतर महाराष्ट्रातील शिवसेनेचे नेते, खासदार त्यांचे नातेवाईक आणि मित्रांना इडी आणि इतर तपास यंत्रणांकडून लक्ष्य केलं जात आहे. इडीने आतापर्यंत २८ जणांची बेकायदेशीर चौकशी केली आहे. मला जे काही सांगायचं ते फडणवीसांना चांगलचं कळतय,' असे म्हणत शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमधील आमदार आणि मंत्र्यांमागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. 'सत्यमेव जयते' म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut)यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu)यांना एक पत्र लिहिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा ईडीवरुन वाद पेटला आहे. याच पार्श्वभुमीवर आज संजय राऊतांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र, पश्चिम बंगाल मध्ये तपास यंत्रणांद्वारे सुरु असलेल्या कारवाईवर हल्लाबोल केला आहे.

bjp-shivsena latest political news
ईडीकडून सरकार पाडण्याची ऑफर ; राऊतांचा खळबळजनक दावा, उपराष्ट्रपतींना पत्र

इडीच्या कार्यालयात बेकायदेशीर लोक बसतात. राजकीय स्वार्थासाठी तपास यंत्रणांचा वापर करुन विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझ्या मुलीच्या लग्नातील मंडपडेकोरेटर, कंत्राटदारांना बंदूकीचा धाक दाखवून त्यांच्याकडून चौकशी केली गेली. त्यांना धमकावलं जात आहे. मी त्यांना पैसे दिल्याचं त्यांनी लिहून दिलं नाही तर त्यांना अटक करण्याची धमकी दिली गेली. आज महाराष्ट्रात इडीकडे सर्वाधिक केसेस आहेत. इडीच्या नावावर वसुली सुरु आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन विरोधी पक्षनेत्यांवर खोटे गुन्हे दाखल करायचे. त्यांचा आवाज दाबायचा. त्यांना खोट्या केसेसमध्ये अडकवायचं आणि सरकारं पाडायची, हे जे सुरु आहे, त्याला आम्ही जुमानत नाही, या दडपशाहीला घाबरत नाही.

माझी अवस्था अनेक वर्षे जेलमध्ये काढलेल्या रेल्वेमंत्र्यांप्रमाणे करु अशी धमकीही मला देण्यात आली. पण ते भ्रमात आहेत. तपास यंत्रणा क्रिमिनल सिंडीकेट च्या भाग झाल्या आहेत. भाजप नेते, अनिल देशमुखांच्या पाठोपाठ तुम्हालाही त्यांच्या बाजूच्या कोठडीत पाठवू, अशा धमक्या देत आहेत. पण याद राखा, जर आम्ही कोठडीत गेलो तर तुम्हालाही त्याच कोठडीत आणल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही संजय राऊतांनी दिला आहे. कारण तुमची पापं जास्त आहेत.

bjp-shivsena latest political news
भाजपचे 6 उमेदवार डेऱ्यात दाखल झाले अन् 24 तासांतच बाबा राम रहीम तुरुंगातून बाहेर

आजच जे पत्र आहे ते माहितीसाठी लिहींल आहे. हा ट्रेलर नाही, ट्रेलर तर अजून यायचा आहे. पण इडीचे लोक कशाप्रकारे सिंडीकेट चालवतात. तपास यंत्रणांकडूनच आर्थिक घोटाळे सुरू आहेत. यांच्याकडूनच मनी लॉण्ड्रिंग होत आहे. हेच ब्लॅकमेल करतात, धमक्या देतात. यांचे बाहेर वसुली एजंट आहेत, हे सर्व पुराव्यानिशी देणार आहे. इडीला बेनकाब करणार आहे. बेकायदेशीरपणे राज्य सरकारमधील नेत्यांना खोट्या केसेसमध्ये अडकण्याचे काम सुरु आहेत.शरद पवार, ठाकरे कुंटूबियांना अडकवण्याचं काम सुरु आहे. पण कोण आहेत हे, महाराष्ट्रातही तपास यंत्रणा आहेत, त्या आधी तपास करतील. पण तुम्ही या फेडरल सिस्टिमची वाट लावली आहे. जर हुकूमशाही पद्धतीने राज्य करणार असाल तर तुमचीही पोलखोल करावी लागेल. असेही संजय राऊतांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com