INDIA Meeting In Mumbai : सोनिया गांधी, राहुल गांधी शिवतीर्थवर जाणार?

BJP News : उद्धव ठाकरे यांच्या आमंत्रणावरून इंडिया नावाची बोगस आघाडी मुंबईत येत आहे.
Balasaheb Thackeray-Rahul Gandhi-Soniya Gandhi
Balasaheb Thackeray-Rahul Gandhi-Soniya GandhiSarkarnama

Mumbai News : इंडिया आघाडीच्या तिसऱ्या बैठकीसाठी काँग्रेस नेत्या खासदार सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी आज मुंबईत येत आहेत. बैठकीचे आयोजक या नात्याने उद्धव ठाकरेंकडून त्यांचे स्वागत केले जाणार आहे. या मायलेकांसह धर्मनिरपेक्ष नेत्यांना उद्धव ठाकरे हे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर दर्शनासाठी नेणार का, असा सवाल भाजपकडून विचारण्यात येत आहे. (Sonia Gandhi, Rahul Gandhi will go to Shivtirtha?)

भाजपचे आमदार अतुल भातखळकर आणि नीतेश राणे यांनी याबाबतचा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचले आहे. भातखळकर यांनी म्हटलं आहे की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहण्यासाठी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी कधीही एक ट्विटसुद्धा केलेले नाही. या दोघांसह तथाकथित धर्मनिरपेक्ष नेत्यांना उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांच्या स्मृतिस्थावर दर्शनासाठी घेऊन जाणार का, असा सवाल केला आहे.

Balasaheb Thackeray-Rahul Gandhi-Soniya Gandhi
Rahul Gandhi Mumbai Tour : बाळासाहेबांनी ‘तेव्हा’ राहुल गांधींना कडाडून विरोध केला अन्‌ उद्धव ठाकरेंनी आता मातोश्रीपर्यंत 'रेड कार्पेट' अंथरले!

उद्धव ठाकरे यांच्या आमंत्रणावरून इंडिया नावाची बोगस आघाडी मुंबईत येत आहे. या आघाडीची मुंबईत बैठक होत आहे, त्यासाठी राहुल गांधी आणि सोनिया गांधी हे आज मुंबईत येत आहेत. त्यानिमित्ताने उद्धव ठाकरे यांना माझे काही सवाल आहेत, ठाकरे यांनी त्यांची उत्तरे द्यावीत, असे आवाहन आमदार भातखळकर यांनी केले आहे.

Balasaheb Thackeray-Rahul Gandhi-Soniya Gandhi
Nashik NCP Executive : शरद पवार गटाची नाशिकमध्ये निवडणूक मोर्चेबांधणी; नव्या शिलेदारांकडे राष्ट्रवादीचे सुकाणू

आमदार भातखळकर म्हणाले की, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांची राहुल गांधींनी नेहमी बदनामी केली. सावरकरांच्या मुद्दयावरून राहुल गांधींची तुम्ही कानउघडणी करणार का? याच बोगस आघाडीच्या माध्यमातून कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या मुंबईत तुमचा पाहुणचार घेण्यासाठी येत आहेत. त्यांनाही बेळगाव आणि सीमा भागातील मराठी बांधवांवरील अत्याचारासंदर्भात खडेबोल सुनावणार का?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com