Rahul Gandhi Mumbai Tour : बाळासाहेबांनी ‘तेव्हा’ राहुल गांधींना कडाडून विरोध केला अन्‌ उद्धव ठाकरेंनी आता मातोश्रीपर्यंत 'रेड कार्पेट' अंथरले!

India Meeting News : बदलत्या परिस्थितीनुसार शिवसेनेने आगामी काळात महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत मवाळ भूमिका घेतली आहे.
Balasaheb Thackeray-Uddhav Thackeray-Rahul Gandhi
Balasaheb Thackeray-Uddhav Thackeray-Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी हे २०१० मध्ये मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी लोकलने प्रवास केला होता. पण, तेव्हा राहुल गांधी यांना मुंबईत पाय ठेवू देणार नाही, अशी भूमिका बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने घेतले होती. विशेष म्हणजे त्यावेळीही शिवसेनेची सर्व सूत्रे उद्धव ठाकरे यांच्याच हाती होती. मात्र, त्याच उद्धव ठाकरेंकडून गुरुवारी (ता. ३१ ऑगस्ट) इंडियाच्या बैठकीस येत असलेल्या राहुल गांधी यांचे स्वागत केले जाणार आहे. (Balasaheb Thackeray opposed Rahul Gandhi, now Uddhav Thackeray laid 'red carpet')

मुंबईत गुरुवारी आणि शुक्रवारी इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीत इंडिया आघाडीच्या लोगोचे अनावरण केले जाणार आहे. तसेच, यावेळी इंडिया आघाडीच्या संयोजकाची घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Balasaheb Thackeray-Uddhav Thackeray-Rahul Gandhi
Nashik NCP Executive : शरद पवार गटाची नाशिकमध्ये निवडणूक मोर्चेबांधणी; नव्या शिलेदारांकडे राष्ट्रवादीचे सुकाणू

गेल्या अडीच वर्षांपासून शिवसेना ही महाविकास आघाडीत काँग्रेससोबत एकत्र आली आहे. तेव्हापासून शिवसेनेने मवाळ भूमिका घेतल्याचा आरोप त्यांच्या विरोधकांकडून होत आहे. सत्ता गेल्यानंतरसुद्धा उद्धव ठाकरे गटाने काँग्रेससोबत आघाडीत एकत्र राहण्याची भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या शिंदे गटाकडून तसेच भाजपकडून ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे.

Balasaheb Thackeray-Uddhav Thackeray-Rahul Gandhi
Amit Shah Maharashtra Tour : अमित शाह पुन्हा महाराष्ट्रात येणार ; मराठवाड्याच्या दौऱ्यावर..

राहुल गांधी यांच्या २०१० मधील दौऱ्याला आक्रमकपणे विरोध करून शिवसेनेने वेगळी भूमिका घेतली होती. ही भूमिका त्यावेळच्या पक्षाच्या धोरणाला अनुरूप अशी होती. त्यानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. बदलत्या परिस्थितीनुसार शिवसेनेने आगामी काळात महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत मवाळ भूमिका घेतली आहे. त्याचा फायदा आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत कितपत होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Balasaheb Thackeray-Uddhav Thackeray-Rahul Gandhi
INDIA Mumbai Meet : खर्गेंच्या विश्वासू खासदाराने ठाकरे गटातील नेत्यांसोबत केली पाहणी ; खासदार सावंत, नार्वेकर गुंतले तयारीत..

दुसरीकडे, शिवसेना उद्धव ठाकरे गटाची नवी भूमिका मतदारांना कितपत रुचणार, हे पाहण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीची वाट पाहवी लागणार आहे. त्यामुळे शिवसेनेने केलेला हा धोरणात्मक बदल लोक स्वीकारणार की नाही, हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com