वानखेडे अन् एनसीबीला विशेष न्यायालयाकडून झटका

प्रभाकर साईलने रविवारी धक्कादायक खुलासे केले आहेत.
Sameer Wankhede
Sameer WankhedeFile Photo
Published on
Updated on

मुंबई : आर्यन खान (Aryan Khan) ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदार व किरण गोसावीचा (Kiran Gosavi) बॉडीगार्ड प्रभाकर साईलने रविवारी धक्कादायक खुलासे करत या प्रकरणाला वेगळं वळण दिलं आहे. साईलने एनसीबीसह विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे साक्षीदार फितूर झाल्याचे सांगंत एनसीबीने सोमवारी विशेष एनडीपीएस (NDPS Court) न्यायालयात धाव घेतली होती. तसेच विभागीय संचालक वानखेडे यांनीही न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले होते.

प्रभाकर साईलने रविवारी एक व्हिडीओ जारी केला. तसेच त्याने एक अॅफिडेव्हिटही केले आहे. त्यामध्ये त्याने आर्यन खान प्रकरणात किरण गोसावी व सॅमने शाहरूख खानकडून पैसे उकळल्याचा दावा केला आहे. पंचवीस कोटी रुपयांची डील ठरली होती. त्यातील आठ कोटी रुपये वानखेडे यांना जाणार असल्याचे किरण गोसावी सॅम डिसूजाला सांगत होता, असा खळबळजनक आरोप प्रभाकरने केला आहे.

Sameer Wankhede
उल्हासनगरमध्ये राजकीय भूकंप? पप्पू कलानी-जयंत पाटलांमध्ये मध्यरात्रीपर्यंत खलबत

या प्रतिज्ञापत्राची दखल घेतली जाऊ नये, असे आदेश देण्याची विनंती एनसीबीने न्यायालयाला प्रतिज्ञापत्राद्वारे केली होती. तसेच वानखेडे यांनीही प्रतिज्ञापत्रात आपली बदनामी केली जात असल्याचे म्हटले होते. याची दखल घेत त्यानुसार आदेश द्यावेत, असं त्यांनी म्हटलं होतं. पण न्यायालयाने एनसीबीची विनंती फेटाळून लावली आहे. त्यामुळे त्यांना झटका बसला आहे.

सोमवारी या प्रतिज्ञापत्रावर सुनावणी झाली. न्यायाालयाने सरसकट आदेश काढता येणार नाहीत, असं स्पष्ट केलं आहे. या प्रकरणातील आरोपींचे जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. अशा स्थितीत असा कोणताही आदेश काढता येणार नाही, अस सांगता न्यायालयानं एनसीबीचा अर्ज निकाली काढला. दरम्यान, आज आर्यन खानच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मागील दोन दिवसांपासून या प्रकरणाला वेगळं वळण लागल्याने उच्च न्यायालयात काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एनसीबीने प्रतिज्ञापत्रात काय म्हटलं होतं?

एनसीबी व अधिकाऱ्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी असे आरोप करण्यात आले आहेत. आर्यन खान याच्या जामीनावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्याआधी प्रभाकर यांचे अॅफिडेविट समोर आले आहे. तसेच कोणत्याही योग्य मार्गाचा वापर त्यासाठी करण्यात आलेला नाही. त्यामुळे आर्यन खान प्रकरणाच्या चौकशीवर त्याचा परिणाम होऊ नये, यासाठी त्या अॅफिडेविटची दखल घेऊ नये, असं एनसीबीने न्यायालयात सादर केलेल्या अॅपिडेविटमध्ये म्हटलं आहे.

प्रभाकरच्या अॅफिडेविटच्या आधारे कोणतीही कारवाई न करण्याचे आदेशही द्यावेत, असंही एनसीबीने म्हटलं आहे. यावर न्यायालयाकडून आज दुपारी आदेश दिले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, वानखेडे यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहे. आपली प्रतिमा मलिन करण्यासाठी काही व्यक्तींकडून जाणीवपूर्वक आरोप केले जात आहे. कुटुंबीयांना लक्ष केलं जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com