फडणवीसांनी सोमय्यांना जोड्यानं मारलं पाहिजे, तेच वकिली करताहेत ; राऊतांचा टोला

गोळवलकर गुरुजी, बाळासाहेब देवरस, हेडगेवार यांचा जीव तीळतीळ तुटला असेल, त्यांच्या आत्माला काय वाटत असेल.
Sanjay Raut, Kirit Somaiya, Devendra Fadnavis
Sanjay Raut, Kirit Somaiya, Devendra Fadnavissarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : ''भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी जमा केलेल्या पैशांचा घोटाळा हा देशात घडलेल्या घोटाळ्यातील सर्वात मोठा घोटाळा आहे, असे असताना नकली हिंदुत्वाचे पुरस्कर्ते असेलेले भाजपचे विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे किरीट सोमय्या (Kirit Somaiya)यांची वकिली कशी करु शकतात,'' असा सवाल शिवसेनेचे खासदास संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपस्थित केला आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते.

''सोमय्याची केलेल्या भष्ट्राचार ऐकून राष्ट्रीय स्वंयसंघाचे गोळवलकर गुरुजी, बाळासाहेब देवरस, हेडगेवार यांचा जीव तीळतीळ तुटला असेल, त्यांच्या आत्माला काय वाटत असेल. सोमय्यांना फडणवीसांनी जोडे मारले पाहिजे, तेच सोमय्यांची वकीली करीत आहेत," असे राऊत म्हणाले.

Sanjay Raut, Kirit Somaiya, Devendra Fadnavis
सोमय्या पित्रा-पुत्राच्या अडचणी वाढणार ; गुन्हा दाखल, अटक होणार?

राऊत म्हणाले, ''आयएनएस विक्रांतबाबत देशभावना आहेत. शहिदाचा बलिदानाचा पैशाचा लिलाव करुन सोमय्यांनी पैसा जमा केला आहे,सोमय्यांचा मुखवटा गळून पडला आहे. सोमय्यांना अटक व्हावी, यासाठी शिवसेना राज्यभर आंदोलन करणार आहे. देशाचं संरक्षण करणं हे महाराष्ट्राचं कर्तव्य आहे,'' ''राज्यात जर कुणी गद्यार निपजला असेल तर त्याला जमिनीत गाडण्यात येईल,'' असा इशारा राऊतांनी दिला.

आयएनएस विक्रांत या युद्धनैाकेच्या डागडुजीसाठी सोमय्यांनी अभियान सुरू केले होते. या अभियानतून जमा केलेले कोट्यावधी रुपये राज्यपाल यांना देणार असल्याचे सांगितले होते. मात्र, हे पैसे राज्यपाल यांना न देता आर्थिक सहाय्यता अपहार केल्याप्रकरणी सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील याच्या विरोधात कलम ४०६, ४२०, ३४ भा द वि कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवृत्त युद्धनौका आयएनएस विक्रांतच्या डागडुजीसाठी किरीट सोमय्या यांनी लोकांकडून निधी गोळा केला. मात्र हा निधी राजभवनात जमा केला नाही अशी तक्रार फिर्यादी बबन भोसले यांनी दाखल केली होती.

Sanjay Raut, Kirit Somaiya, Devendra Fadnavis
दंगली भडकल्या तर त्याला जबाबदार राज ठाकरे ; वाद पेटला, पुतळ्याचे दहन

सेव्ह विक्रांतच्या नावाखाली किरीट सोमय्यांनी कोट्यवधी जमा केले. या कटाचे प्रमुख सूत्रधार देशद्रोही सोमय्याच आहेत, असा गंभीर आरोप संजय राऊत यानी केला आहे. तर पुरावे द्या सोमय्यांचे राऊतांना आव्हान दिले. त्याचवेळी राऊत यांनी राज्यपाल कार्यालयाने जी माहिती दिली आहे, ती काय खोटी आहे का, असा सवाल उपस्थित केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com