Amit Shah News : अमित शाह यांच्या सोबतच्या बैठकीत राज्यातील नेत्यांची चर्चा; काय घडले नेमके?

Political News: अमित शाह यांची येथे भाजपच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीबाबत मार्गदर्शन केले.
Amit Shah, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar
Amit Shah, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News: राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने सगळीकडे निवडणुकीची लगबग सुरु आहे. दुसरीकडे राज्यात गणरायाचे जल्लोषात शनिवारी आगमन झाले.

राजकारणी, मोठे सेलिब्रिटींसह सर्वांनीच घरात गणरायाची विधिपूर्वक स्थापना केली. त्यानंतरही प्रत्येक ठिकाणी राजकारणावरच चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली होती. त्यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत.

रविवारी सायंकाळी ते मुंबईत दाखल झाले आहेत. त्यानंतर मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे दाखल झाल्यानंतर अमित शाह यांची येथे भाजपच्या (BJP) प्रमुख नेत्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीबाबत मार्गदर्शन केले.

रविवारी अमित शाह मुंबईत आल्यानंतर महायुतीच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत. त्यानंतर त्यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीस विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना सूचना केल्या.

शाह यांच्या उपस्थितीत रविवारी लोकसभा निवडणुकीत महायुतीचा झालेला पराभव या विषयावर चर्चा झाली. त्यासोबतच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाबाबतही या बैठकीत चर्चा झाली. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती काय नवीन गणितं आखणार आहे? ते पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

Amit Shah, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar
Harshvardhan Patil News: 'हर्षवर्धनभाऊ तुम्ही आता वाजवा तुतारी'; या बॅनरमुळे रंगली इंदापूरमध्ये पक्षांतराची जोरात चर्चा

अमित शाह यांचा रविवारचा मुक्काम हा सह्याद्री अतिथीगृहावर होता. अमित शाह यांना भेटण्यासाठी भाजपचे (BJP) अनेक दिग्गज नेते सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले होते. त्यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासह राज्यातील अनेक दिग्गज नेते अमित शाह यांच्या भेटीसाठी आले होते.

या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीबाबत चर्चा झाली. राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजना सारख्या अनेक लोकपयोगी योजनांची घोषणा करण्यात आली आहे. त्यासोबतच विधानसभा निवडणुकीत प्रचारामध्ये कोणकोणते मुद्दे असावेत, विधानसभेसाठी जागावाटप कसे असावे, याबाबत या बैठकीत चर्चा झाली असल्याचे समजते.

Amit Shah, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar
Laxman Hake : विधानसभेला कुणाला पाडायचं हे ओबीसींचं ठरलंय, लक्ष्मण हाकेंनी सांगितला 'प्लॅन'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com