Harshvardhan Patil News: 'हर्षवर्धनभाऊ तुम्ही आता वाजवा तुतारी'; या बॅनरमुळे रंगली इंदापूरमध्ये पक्षांतराची जोरात चर्चा

Political News : विधानसभा निवडणुकीत नव्या पर्यायाचा शोध घेतला जात आहे. त्यातच आता इंदापूरमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याविषयी लावण्यात आलेल्या बॅनरची सध्या जोरात चर्चा सुरु आहे.
Indapur banner
Indapur banner Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले आहे. या निवडणुकीत महायुतीला सपाटून मार खावा लागला आहे. त्यामुळे बॅकफूटवर असलेल्या महायुतीमधील नेतेमंडळीत थोडीसी नाराजी दिसत आहे. त्यामुळेच येत्या काळात सर्वांचा कल सध्या आघाडीकडे दिसत आहे. त्यामुळेच तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीत नव्या पर्यायाचा शोध घेतला जात आहे. त्यातच आता इंदापूरमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याविषयी लावण्यात आलेल्या बॅनरची सध्या जोरात चर्चा सुरु आहे.

एकीकडे इंदापुरमध्ये विधानसभा निवडणुकीत काय होणार याची उत्सुकता लागली असतानाच गेल्या काही दिवसापासून हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) हे भाजप सोडण्याच्या विचारात असल्याची चर्चा सुरु आहे. येत्या काळात लवकरच शरद पवार (Sharad Pawar) गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर "इंदापूर तालुक्याच्या जनतेची झाली तयारी! हर्षवर्धनभाऊ तुम्ही आता वाजवा तुतारी", असे बॅनर लागले आहे. हे बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत असून यामुळे तालुक्यातील राजकारणाला वेगळे वळण येत्या काळात लागणार असल्याची चर्चा सुरू आहे.

इंदापूरमध्ये झळकत असलेल्या या बॅनरवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व माजी मंत्री भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांचा एका कार्यक्रमातील सामूहिक फोटो आहे. त्यासोबतच या बॅनरवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तुतारी चिन्ह आहे. विशेष म्हणजे हा बॅनर कोणी लावला हे समजले नसले तरी त्या बॅनर वरील मजकूर हा इंदापूर तालुक्याचे जनतेचे मत व्यक्त करणारा आहे.

आठ दिवसापूर्वी बावडा येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात देखील कार्यकर्त्यांनी पाटील यांनी तुतारी हाती घ्यावी, असा सूर उमटला होता. यावर "इंदापूर तालुक्याच्या जनतेची झाली तयारी! हर्षवर्धनभाऊ तुम्ही आता वाजवा तुतारी", असा मजकूर या बॅनरवर लिहलेला आहे. यामुळे येत्या काळात इंदापूर तालुक्यातील राजकारणाला वेगळे वळण तर घेत नाही ना..? अशी चर्चा सुरू झाली आहे.

Indapur banner
Ajit Pawar News : अजित पवारांचे मोठं विधान; म्हणाले, 'बारामतीमधील उमेदवार ठरवताना...'

गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील हे शरद पवार यांच्या गटात प्रवेश करतील, अशा चर्चा जोरात रंगली आहे. हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांची पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये बैठक देखील पार पडली होती. तर शनिवारी मुंबईत मंत्री गिरीश महाजन यांच्या गणरायाच्या आरतीसाठी हर्षवर्धन पाटील गेले. यावेळी त्यांनी भाजपमध्येच असल्याचे स्पष्ट केले. बॅनर लागल्याने पुन्हा एकदा इंदापूर तालुक्यामध्ये नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये हा चर्चेचा विषय झाला आहे.

राज्यातील विधानसभेच्या निवडणूका दिवाळीनंतर होणार आहेत. त्यामुळे त्याकडे लक्ष लागले आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून विविध मतदारसंघांवर दावे प्रतीदावे सुरू झाले आहेत. त्यामुळे येत्या काळात नक्की हर्षवर्धन पाटील काय करणार आहे?.. याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Indapur banner
Gulabrao Patil News : गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना; नेमके कारण काय ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com