Silver Oak Attack : न्यायालयाचा निर्णयानंतर पेढे वाटणाऱ्यांनी आज पवारांच्या घरावर दगडफेक का केली?

शरद पवार यांच्या घरावर हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.
Jayant Patil-Silver Oak Attack
Jayant Patil-Silver Oak AttackSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावर आज (ता. ८ एप्रिल) काही समाजकंटक व्यक्तींनी दगडफेक केली. उच्च न्यायालयाचा निर्णय गुरुवारी (ता. ७ एप्रिल) आल्यानंतर काही लोकांनी पेढे वाटले असताना, आज त्याच समूहातील व्यक्तींनी अशा प्रकारे पवार साहेबांच्या घरावर दगडफेक करण्याचे कारण काय?, असा सवाल राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी उपस्थित करत पोलिसांनी या दगडफेकीच्या मागचे कर्ते करविते, जे कोणी लोक असतील त्यांना आणि दगडफेक करणाऱ्या लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली. (Strict action should be taken against those who attacked Sharad Pawar's house: Jayant Patil)

Jayant Patil-Silver Oak Attack
माझे आई-वडिल आणि मुलांसाठी मुंबई पाेलिसांनी जे केले, त्याबद्दल आभार!

एसटीच्या आंदोलक कर्मचाऱ्यांनी आज (ता. ८ एप्रिल) ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानावर हल्ला केला. त्याचा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करत निषेध केला. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आजपर्यंत महाराष्ट्रात अशा प्रकारे कधीही नेत्यांच्या घरावर चालून जाण्याचे कृत्य कोणत्याही परिस्थितीत झाले नव्हते. महाराष्ट्राचे लोकनेते असलेल्या पवार साहेबांच्या घरावर अशा प्रकारे दगडफेक होणे, हे अत्यंत निंदनीय कृत्य आहे. आम्ही याचा तीव्र शब्दांत निषेध करतो. पोलिसांनी या दगडफेकीच्या मागचे कर्ते करविते जे कोणी लोक असतील, त्यांना आणि दगडफेक करणाऱ्या लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली आहे.

Jayant Patil-Silver Oak Attack
ST Strike : एसटी कर्मचाऱ्यांचे नुकसान होवू नये; आजही हीच भूमिका : जितेंद्र आव्हाड

दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांना विनंती करतो आहे. गेली कित्येक महिने आपण संपावर आहात. आपल्या जवळपास सर्व मागण्या मंजूर केल्या आहेत. उच्च न्यायालयाने प्रत्येकवेळी तुम्हाला सांगितलं आहे, काही मार्ग सुचवला. एवढं सगळं झाल्यानंतरही पवार यांच्या घरा हल्ला करण्याचं काही कारण नव्हतं. विलिनीकरण करणं शक्य नाही, हे उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीने सांगितलेलं आहे, ते कामगारांनाही मान्य होतं. एवढा पगार दिला तर विकासकामांना एक रुपयाही शिल्लक राहणार नाही. तरीही पैसे वाढवून दिले. तरीही अशा प्रकारे पवार यांच्या घरावर हल्ला करणं निंदनीय आहे. यांचे बोलविते धनी हे वेगळे असण्याची शक्यता आहे, असा संशय अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com