माझे आई-वडिल आणि मुलांसाठी मुंबई पाेलिसांनी जे केले, त्याबद्दल आभार!

एसटीच्या आंदोलक कर्मचाऱ्यांसह सर्वांनाच माझी हात जोडून विनंती आहे की, आमची सर्वांचीच चर्चेला बसायची तयारी आहे.
Supriya Sule
Supriya SuleSarkarnama

मुंबई : एसटीच्या आंदोलक कर्मचाऱ्यांसह सर्वांनाच माझी हात जोडून विनंती आहे की, आमची सर्वांचीच चर्चेला बसायची तयारी आहे. आंदोलकांनी फक्त शांततेच्या मार्गाने घ्यावे. अशा मार्गाने प्रश्न सुटत नाहीत. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की, आपण चर्चेला बसू शकतो. आम्ही अनेकवेळा याआधीही चर्चेला बसलेलो आहोत. आमची अजूनही चर्चेसाठी बसायची तयारी आहे. जे काही करायचे आहे, ते शांततेच्या मार्गाने करूयात, अशी हात जोडून विनंती खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी एसटीच्या आंदोलक कर्मचाऱ्यांना केली. (After the attack on 'Silver Oak', Supriya Sule requested the protesters ...)

एसटीच्या कर्मचारी आंदोलकांनी आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानावर हल्ला केला. चप्पलफेक करण्यात आली आहे. त्यावेळी संतप्त आंदोलकांना भेटण्यासाठी खुद्द खासदार सुप्रिया सुळे घराबाहेर आल्या होत्या. मात्र, आंदोलक ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी घटनास्थळी दाखल होत स्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी वरील विनंती केली.

Supriya Sule
ST कर्मचारी 'सिल्वर ओक'बाहेर आक्रमक; अ‍ॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या चौकशीचे आदेश

त्या म्हणाल्या की, मुंबई पोलिसांनी तातडीने येऊन माझे आई-वडिल आणि मुलांसाठी जे केले आहे, त्याबद्दल मुंबई पोलिसांचे जाहीपणे मनःपूर्वक आभार मानते. जी घटना घडली, ती अत्यंत दुर्दैवी आहे. आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीत मी पहिल्यांदाच अशी घटना पाहिली आहे. पण आमची हरकत नाही. माझी आंदोलकांसह सर्वांनाच हात जोडून विनंती आहे की, आमची सर्वांचीच चर्चेला बसायची तयारी आहे. आंदोलकांनी फक्त शांततेच्या मार्गाने घ्यावे. अशा मार्गाने प्रश्न सुटत नाहीत. आपण चर्चेला बसू शकतो. आम्ही अनेकवेळा याआधीही बसलेलो आहोत. आमची अजूनही चर्चेसाठी बसायची तयारी आहे. जे काही करायचे आहे, ते शांततेच्या मार्गाने करूयात.

Supriya Sule
12 तारखेला 12 वाजवणार... आक्रमक एसटी कर्मचाऱ्यांचा इशारा

जे आंदोलक गुरुवारी (ता. ७ एप्रिल) जल्लोष करत होते, ते आज (ता. ८ एप्रिल) रस्त्यावर का उतरले आहेत. विलिनीकरण न झाल्याचा राग व्यक्त होतो आहे का, या प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे नाहीत, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. मात्र, माझ्या घरावर आज एक मोठा हल्ला झाला आहे आणि तो दुर्दैवी आहे, असे त्यांनी शेवटी नमूद केले.

Supriya Sule
तसं मी कुणाचं ऐकत नाही...पण मराठवाडा माझी सासूरवाडी असल्यानं ऐकावं लागतं!

अदृश्य शक्तीकडून माथी भडकविण्याचे काम : संजय राऊत

हा अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याचा सरकारने प्रयत्न केला आहे. मात्र कोणती तरी एक अदृश्य शक्ती माथी भडकविण्याचे काम करत आहे. ज्यांच्या पोटात आणि डोळ्यांत महाविकास आघाडीचे सरकार खुपते आहे, त्यांचा या आंदोलनामागे हात आहे, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com