मुंबई : दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा (Board Exam) ऑनलाईन घ्याव्यात, या मागणीसाठी राज्यभरातील विद्यार्थी ठिकठिकाणी रस्त्यावर उतरले आहेत. नागपूर (Nagpur) , औरंगाबाद (Aurangabad), मुंबई (Mumbai) आणि उस्मानाबादमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र विदयार्थ्यांच्या या आंदोलनाचे नेतृत्त्व कोण करत आहे, या विद्यार्थ्यांना कोण भडकवतंय? असाही प्रश्न उपस्थित होत आहेत. तर दूसरीकडे विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याने कोरोना नियमांचाही फज्जा उडाल्याचं चित्र आहे.
दरम्यान, या बाबत राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड वर्षा गायकवाड यांनी याबाबत आपले आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गेल्या दोन वर्षात राज्यातील कोरोना महामारीची परिस्थिती पाहता, राज्यातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठीही राज्यसरकार प्रयत्न करत आहे.
अशातच दहावी बारावी बोर्ड परीक्षा महिनाभरावर आलेली असताना, बोर्ड परीक्षा वेळापत्रकानुसार होणार की लांबणीवर पडणार? याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र परीक्षा ऑफलाईन पद्धतीने वेळापत्रकानुसारच होईल, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितल आहे. मात्र 15 फेब्रुवारीपर्यंत त्या वेळच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, असही वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, दहावी बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठीही परीक्षा एक महिना पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे. त्यासोबतच विद्यार्थी आणि पालकांनीसुद्धा परीक्षा संदर्भात प्रतिक्रिया दिल्या आहेत.
शाळांनी दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने शिकवत जरी पूर्ण केला असला तरी स्वतःच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना आणखी पुरेसा वेळ हवा आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलली तर अभ्यासाची आणखी तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल, असं काही विद्यार्थ्यांनी म्हटलं आहे. तर नियोजित वेळापत्रकनुसार परीक्षा झाली तर पुढे परीक्षांचा निकाल वेळेत लागेल आणि अकरावी प्रवेशप्रक्रियाही वेळेत होईल, असं काही पालक आणि विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. 'ज्या पध्दतीन विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, मारहान केली तो महाराट्राच्या शिक्षण क्षेत्रातील काळा इतिहास आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून विद्यार्थी, पालक हे मुद्दे मांडत होते. पण राज्य सरकारने त्यांच्याकडे गांभीर्याने पाहिले नाही. सरकारने विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधायला पाहिजे होता. पण हिटलरशाही पध्दतीनं विद्यार्थ्यांना मारहान केली गेली. किमान आता तरी राज्य सरकारने हा विषय गांभिर्यांने घ्यावे, ही निष्पाप, कोवळ्या वयाची मुले आहेत, त्यामुळे राज्य सरकारने विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.