Shiv Sena News : कल्याणचा दौरा होताच ठाकरेंना धक्का; माजी आमदाराची शिंदेंना साथ?

Setback to Uddhav Thackeray Shiv Sena in Kalyan Dombivli : उद्धव ठाकरेंचा कल्याण दौरा होताच मुख्यमंत्री शिंदेंनी दिला धक्का...
Eknath Shinde, Subhash Bhoir
Eknath Shinde, Subhash Bhoir Sarkarnama
Published on
Updated on

Kalyan Dombivli Shiv Sena News :

उद्धव ठाकरे यांचे निष्ठावंत नेते आणि कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर यांच्या मनात नेमके काय सुरू आहे. त्यांची राजकीय भूमिका नेमकी काय आहे यासंदर्भातील कुजबुज सुरू आहे.

अशातच शीळफाटा येथील उड्डाणपूलाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री Eknath Shinde यांच्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख सुभाष भोईर हे उपस्थित राहिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. आपल्या घरात कोणी पाहुणा आला तर, आपण हजेरी लवतोच. त्याचप्रमाणे मी हजेरी लावली, असे वक्तव्य त्यांनी सरकारनामाशी बोलताना केले.

Eknath Shinde, Subhash Bhoir
Loksabha Election 2024 : पवार-कलानी यांच्या भेटीनंतर भाकरी फिरल्याची चर्चा; परिणाम कल्याण लोकसभा निवडणुकीत?

राजकीय अज्ञात वासात...

शिवसेना पक्ष फुटीनंतर शिंदे गट आणि ठाकरे गट वेगळे झाले. यामध्ये माजी आमदार सुभाष भोईर यांनी ठाकरे गटाबरोबर राहणे पसंत केले. असे असले तरी गेल्या सहा महिन्यांपासून त्यांनी कोणतेही राजकीय भाष्य केलेले नाही. माजी आमदार सुभाष भोईर अज्ञातवासात आहेत का? अशी चर्चा ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये रंगली होती.

माजी आमदार भोईर आणि मुख्यमंत्री एकत्र...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी कल्याण-डोंबिवली येथील विविध विकास कामांचे लोकार्पण केले. यावेळी माजी आमदार सुभाष भोईर हे त्यांच्याबरोबर कार्यक्रमात एकत्र दिसून आले. त्यानंतर पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.

सध्या ते ठाकरे गटाचे कल्याण जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. ठाकरे गटाकडून विधानसभा निवडणुकीचे तिकीट त्यांना देण्याची शक्यता आहे. या राजकीय पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळ्यात भोईर उपस्थित राहल्याने अनेकांचा भुवया उंचावल्या आहेत. तसेच त्यांच्या विषयी तर्कवितर्क व्यक्त केले जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'...म्हणून त्यांचे स्वागत केले'

माजी आमदार सुभाष भोईर यांनी सांगितले की, मुख्यमंत्री त्याठिकाणी आल्याने त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होतो. ज्या पूलाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यानी केले. त्या पुलाचा प्रस्ताव माझा होता असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे याचा कोणी काही एक अर्थ काढू नये.

कोण आहेत माजी आमदार सुभाष भोईर?

शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख भोईर हे 2014 साली शिवसेनेच्या तिकीटावर कल्याण ग्रामीण भागातून आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत तिकीट दिले होते. मात्र त्यांचे तिकीट ऐनवेळी पक्षाने कापले. त्यांच्या ऐवजी त्याठिकाणी रमेश म्हात्रे यांना तिकीट दिले होते. त्यानंतर भोईर हे राजकारणापासून थोडेफार दूरच होते.

edited by sachin fulpagare

Eknath Shinde, Subhash Bhoir
Eknath Shinde News : अहमदाबाद, हैद्राबादच्या धर्तीवर तिसऱ्या मुंबईसाठी मिळणार एक्सेस कंट्रोल

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com