Eknath Shinde News : अहमदाबाद, हैद्राबादच्या धर्तीवर तिसऱ्या मुंबईसाठी मिळणार एक्सेस कंट्रोल

Kalyan Dombivli Politics : कल्याण -डोंबिवली शहरात रस्ते आणि दळण वळणाच्या सुविधा उभारल्या जात आहेत.
MP Shrikant Shinde, CM Eknath Shinde
MP Shrikant Shinde, CM Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Kalyan Dombivli News : कल्याण डोंबिवली ट्रॅफिक मुक्त व्हावे यासाठी रिंग रोडच्या प्रकल्पाला मंजुरी द्या अशी मागणी मुलगा खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपले वडील आणि राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे केली. ही मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ताबडतोब मान्य करत या रिंगरोडचा तातडीने डीपीआर तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. विविध विकासकामाच्या लोकार्पण आणि भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री कल्याण डोंबिवलीत आले होते.

कल्याण -डोंबिवली शहरात रस्ते आणि दळण वळणाच्या सुविधा उभारल्या जात आहेत. त्याचबरोबर तिसरी मुंबई म्हणून विकसित होत असलेल्या नवी मुंबई विमानतळ – तळोजा – 14 गावे- 27 गावे , कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर शहरांना जोडणारा अहमदाबाद, हैद्राबादच्या धर्तीवर एक्सेस कंट्रोल रिंगरोड तयार करण्यासाठी निधी देण्याची मागणी त्यांनी मान्य केली.

MP Shrikant Shinde, CM Eknath Shinde
Shrikant Shinde : श्रीकांत शिंदेंची पंतप्रधान मोदींना 'युगपुरुषा'ची उपमा; ठाकरे गटाने सांगितलं कारण...

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, यांनी उद्याने ही शहराची फुफ्फुसे असतात, ती वाचवली पाहिजे. तसेच ठाणे मुंबईच्या धर्तीवर कल्याणात देखील डिप क्लीन मोहीम राबविण्याचे आदेश त्यांनी दिले. केंद्र सरकारचा स्वच्छता पुरस्कार महाराष्ट्राला मिळाल्याचा अभिमान वाटत असल्याचे सांगितले. कल्याणमध्ये सुपर सपेशालिटी कॅशलेस रुग्णालय तसेच कचऱ्याची ठिकाणे नष्ट करण्यासाठी ग्रीन कव्हर, अर्बन फॉरेस्ट संकल्पना राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

दरम्यान, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी एम एम आर डी ए च्या माध्यमातून नवी मुंबईपासून मधल्या सगळ्या शहरांना जोडत बदलापूरकडे जाणारा रिंगरोड झाल्यास वाहतूक कोंडीतून नागरिकाची सुटका होईल. शहराच्या दुतर्फा नॅशनल हायवे आणि रिगरोड झाल्यास कोणत्याही शहरातून १५ मिनिटांत बाहेर पडता येईल. म्हणूनच एक्सेस कंट्रोल रिगरोड हा ५० ते ६० किमीचा चार मतदार संघांना जोडणारा रिंगरोड तयार करण्याची मागणी केली होती. ही मागणी मान्य करताना वाहतूक कोंडी फोडण्यासाठी या रिंगरोडचा डीपीआर तातडीने बनविण्याचे सूचना मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएला दिल्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तर कल्याण पश्चिमेकडील मेट्रोची मार्गिका बदलण्याच्या मागणीची दखल घेतल्याचे त्यांनी सांगितले. तर पुण्यातील पीएमपीएल प्रमाणे भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ ,बदलापूर शहरांना जोडणारी एकात्मिक बससेवा सुरू करत प्रवाशांना आरामदायी प्रवासाची सेवा देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

कोरोनाकाळात करोडो रुपये खर्चून लाल चौकी येथे उभारलेल्या रुग्णालय कायम स्वरूपी करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्याचे काय झाले असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी विचारला मात्र मुख्यमंत्र्यांचे आदेश डावलून हे तात्पुरते रुग्णालय कधीच हटविण्यात आले आहे. मात्र ही माहिती मुख्यमंत्र्यांपासून (Eknath Shinde) प्रशासनाने लपविल्याचे समोर आले आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

MP Shrikant Shinde, CM Eknath Shinde
Ashok Chavan Resign From Congress: अशोक चव्हाणांचा राजीनामा अन् महाविकास आघाडी 'चेकमेट'?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com