Sudhir Mungantiwar News : चंद्रपुरातील दारुण पराभवानंतर पहिल्यांदाच मुनगंटीवार मीडियासमोर अन् 'ही' मोठी घोषणा!

Loksabha Election 2024 Result : महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी सिद्ध करून दाखवले.त्यांनी भाजपचे उमेदवार व राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा तब्बल 2 लाख 53 हजार 256 मतांनी पराभूत केले होते.
Sudhir Mungantiwar News
Sudhir Mungantiwar NewsSarkarnama

Mumbai News : भाजपने यंदा चंद्रपूरमधून महाराष्ट्रातील तडफदार नेते सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी दिली होती.काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर आणि मुनंगटीवार यांच्यात थेट लढत झाली. पण या लढतीत त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. पण जिव्हारी लागणारा पराभव विसरुन मुनगंटीवार पहिल्यांदाच पत्रकारांसमोर आले.यावेळी त्यांनी मोठे विधान केले आहे.

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी मोठं विधान करताना विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाची नवी तारीख जाहीर केली. आधी 10 जूनऐवजी होणारे पावसाळी अधिवेशन आता 27 जूनला होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.तसेच आगामी काळात महाविकास आघाडीचा खरा चेहरा समोर आणणार असल्याचेही ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस हे राज्यातील एक तडफदार नेते असून ते महाराष्ट्रातच राहणार असल्याचे स्पष्ट केले.

मुनगंटीवार म्हणाले, पावसाळी अधिवेशन 27 जूनला घेण्याचा निर्णय ठरला मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच महाराष्ट्रातली दुष्काळी परिस्थिती बघता चारा छावणी संदर्भात काही महत्त्वाची चर्चा झाली.अपंग मंत्रालय संदर्भात देखील महत्त्वाची चर्चा झाली. त्याची गती वाढवण्याबाबत चर्चा झाली. तसेच देवेंद्र फडणवीस हे मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थित होते, मात्र ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते असेही ते म्हणाले.

फडणवीसांसंदर्भात कॅबिनेटमध्ये चर्चा नाही, पक्षाच्या बैठकीत चर्चा झाली . नक्कीच पुढच्या बैठकींना उपस्थित राहतील. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र विधानसभेला सामोरे जाणार आहोत. विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये सर्वच पक्ष एकमेकांच्या समोर उभे राहिले आहेत, याबद्दल आम्ही बसून चर्चा करू आणि निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसने एक लाख देण्यासंदर्भात सांगितलं होतं, आता कर्नाटक भगिनी वाट बघत आहे की, कधी त्यांना एक लाख मिळतात असा टोलाही त्यांनी लगावला.

महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी सिद्ध करून दाखवले.त्यांनी भाजपचे उमेदवार व राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा तब्बल 2 लाख 53 हजार 256 मतांनी पराभूत केले होते.

प्रतिभा धानोरकर यांचे पती बाळू धानोरकर यांनी मागील निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळविला होता.तत्कालीन केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांचे त्यांनी राजकीय अस्तित्व जिल्ह्यातून संपवले. विधानसभेच्या निवडणुकीत त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर विजयी झाले. पती खासदार आणि पत्नी आमदार असे एकाच घरी दोन नेते वावरत होते. दुर्दैवाने खासदार बाळू धानोरकर यांचे आजाराने अकाली निधन झाले.

Sudhir Mungantiwar News
Hemant Godse : गोडसे पराभूत होणार हे माहीत होते; मात्र 'या'मुळे दिली उमेदवारी

काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे धानोरकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. धानोरकर कुटुंबियांची लोकप्रियता आणि जातीय समिकरण बघून सुधीर मुनगंटीवार यांची निवडणूक लढण्याची इच्छा नव्हती. मात्र पक्षाचा आदेश झाल्याने त्यांचा नाईलाज झाला.

वास्तविक, लोकसभा निवडणुकीच्या दरम्यानही सुधीरभाऊंनी एक विधान केले होते. ‘माझे तिकिट रद्द झाले, तर बरं होईल,’ अशा आशयाचे ते विधान होते.त्यामुळे लोकसभा लढविण्यासाठी मुनगंटीवार फारसे इच्छुक नव्हतेच.मात्र,राजकारणातील डाव दिसतात,तसे सरळ नसतात.आपल्या मार्गातील अडसर दूर करण्याचा प्रयत्नही अशा निवडणुकीच्या माध्यमातून होत असतो.त्यातूनच कदाचित सुधीर मुनगंटीवार यांच्या गळ्यात लोकसभा उमेदवारीची माळ घातली गेली असावी, अशी चर्चा आहे.

(Ediited By Deepak Kulkarni)

Sudhir Mungantiwar News
Navneet Rana : लोहा जितना तपता है. उतनीही ताकद भरता है! नवनीत राणांनी पुन्हा दम भरला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com