शिवसेना संकटात ; १६ आमदारांनी व्हिप डावलून मतदान केल्याची अध्यक्षांकडून नोंद

"१६ आमदारांनी व्हीप डावलून मतदान केले याची नोंद आम्ही घेतली," असे पत्र अध्यक्षांनी सभागृहासमोर वाचून दाखवले.
Eknath Shinde Latest News, CM Uddhav Thackeray Latest News
Eknath Shinde Latest News, CM Uddhav Thackeray Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राज्यात सत्तांतराच्या नाट्यानंतर आज विधानसभा अध्यक्षपदाची पहिली लढाई भाजप व शिंदे गटाने जिंकली. राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी 164 मते मिळवत ही निवडणूक जिंकली. तर, महाविकास आघाडीच्या राजन साळवींना 107 मते मिळाली. विजयानंतर भाजप आमदारांनी सभागृहात 'जय श्री राम'च्या घोषणा दिल्या.

या निवडणुकीत शिवसेनचा व्हिप शिंदे गटातील आमदारांनी धुडकावून लावला. त्यांनी व्हिप डावलून मतदान केलं. त्यानंतर शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांचे पत्र आले. या पत्राची नोंद अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी घेतली.

"१६ आमदारांनी व्हीप डावलून मतदान केले याची नोंद आम्ही घेतली," असे पत्र अध्यक्षांनी सभागृहासमोर वाचून दाखवले. "शिवसेना विधिमंडळच्या 16 सदस्यांनी पक्षाच्या मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी बजावलेल्या व्हिपच्या विरोधात मतदान केले आहे, याची मी नोंद घेतो," असे नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी सांगितले. आता कुठल्या गटावर कारवाई होणार, हे उद्या समजेल.

Eknath Shinde Latest News, CM Uddhav Thackeray Latest News
एकनाथजी, नार्वेकरांना आपलसं करुन घ्या, नाहीतर तुमचं काही खरं नाही !

आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांना मतदान करावे, असा व्हीप शिवसेनेतर्फे आपल्या सर्व आमदारांना बजावण्यात आला होता. मात्र, शिंदे गटाने शिवसेनेचा व्हीप पाळला नाही. शिवसेनेच्या सर्व बंडखोर आमदारांनी भाजप उमेदवार राहुल नार्वेकर यांना मतदान केले आहे. बविआ आणि मनसेच्या आमदारांनाही राहुल नार्वेकरांना मतदान केले. त्यामुळे राहुल नार्वेकर यांनी बहुमताचा आकडा सहज पार केला. अध्यक्षपदासाठी त्यांना 164 आमदारांनी मतदान केले. समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी व रईस शेख तटस्थ राहिले. एमआयएमचे आमदारही तटस्थ राहिले. त्यामुळे आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांना 107 मते मिळाली.

पत्राला तांत्रिकदृष्टया मान्यता नाही

लोकशाहीच्या सर्वोच्च सभागृहात अध्यक्षपदाची निवड झाली. शिवसेनेच्या 39 आमदारांनी व्हीप पाळला नाही. आम्ही विधानसभा उपाध्यक्षांकडे आमदारांनी व्हीप पाळला नाही म्हणून तक्रार केली आहे. 11 तरखेला न्यायालयात सुनावणी होईल, त्यात ही भूमिका पुढे येईल. राजन साळवी यांचा पराभव झाला हे आम्ही मान्य करतो. घोगवले आणि दिलेल्या पत्राला तांत्रिकदृष्टया मान्यता नाही, असे मला वाटते, असे ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com