Shivsena UBT Vs Shivsena : ठाकरे गटाच्या ईशान्य मुंबईतील माजी नगरसेविका सुवर्णा करंजे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. करंजे यांच्यासोबत असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे. आमदार सुनील राऊत यांच्या त्रासाला कंटाळून पक्ष सोडत असल्याचा आरोप कारंजे यांनी केला आहे. कारंजेंनी केलेल्या आरोपानंतर आमदार सुनील राऊत आक्रमक झाले. (Latest Marathi News)
यावेळी सुनील राऊत (Sunil Raut) यांनी कारंजे यांच्यावर काही आरोप केले. त्यांचे पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी पटत नव्हते. त्यांनी पक्ष सोडल्यामुळे कांजुरमार्ग शाखेतील पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केल्याचे राऊत यांनी सांगितले. ते म्हणाले, "निष्ठा वगैरे ही सगळी खोटे आहे. जिथे आर्थिक गोष्टी असतात तिकडे त्या जातात. त्यांच्या जाण्याने पक्षातील एक कीड निघून गेली. याचा आनंदोत्सव कांजुर शाखेत साजरा करण्यात आला. आर्थिक व्यवहारामुळे सुवर्णा कारंजे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे."
पक्ष सोडताना सुवर्णा कारंजे (Suvarna Karanje) यांनी सुनील राऊत यांच्यावर आरोप केले होते. या आरोपांचाही राऊत यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, "आरोप कुणावर होतो, जे चांगले काम करतात त्यांच्यावर नेहमीच आरोप होतो. मी सर्वांना सांभाळून घेण्याचा काम करण्याचा नेहमीच प्रयत्न केला. मात्र कारंजे यांचे पक्षातील कुणाशीही पटले नाही. नारायण राणे (Narayan Rane) यांच्याबरोबर त्या काँग्रेसमध्ये गेल्या. काँग्रेसकडून त्या दोन वेळा निवडणुका लढल्या आहेत."
कारंजे यांच्या जाण्याने पक्षाला कुठलाही फरक पडणार नाही, असेही राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले. सुनील राऊत म्हणाले, "काँग्रेसकडून (Congress) लढल्या त्या दोन्ही वेळी त्यांची अनामत जप्त झाली. यावरूनच त्यांची काय लोकप्रियता आहे, हे दिसून येते. त्यांचे काय काम आहे हे जनतेला माहिती आहे. त्यामुळे त्या गेल्याने काही चिंता नाही. काही फरक पडत नाही. शिवसेनेचा नगरसेवक पुन्हा एकदा जिंकेन आणि कारंजे यांची अनामत जप्त होईन."
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.