Harshvardhan Jadahv News : राज्यातील सरकार शुद्ध हरपलेले, पण `बीआरएस` शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही..

BRS News : खरतरं कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवणे हे या सरकारचे काम होते, कारण शेतकरी महाराष्ट्रातला होता.
Ex.Mla Harshvardhan Jadhav BRS News
Ex.Mla Harshvardhan Jadhav BRS NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada : राज्यातील शेतकऱ्यांच्या सडून रस्त्यावर फेकून दिला जाणारा कांदा आम्ही बीआरएसच्या माध्यमातून तेलंगणात विकून दाखवला. तीन ते चार रुपये किलोने विकला जाणाऱ्या कांद्याला आम्ही तेंलगणात १८ रुपयांना विकून दाखवला. (Ex.Mla Harshvardhan Jadhav BRS News) कारण महाराष्ट्रातला शेतकरी जगला पाहिजे ही आमची भूमिका आहे. यापुढे देखील राज्यातील सरकारने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले, तरी बीआरएस पक्ष त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असा विश्वास माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दिला.

Ex.Mla Harshvardhan Jadhav BRS News
Dhananjay Munde Letter to Sattar : सत्तारसाहेब अधिकची पथक नेमा, शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा..

अडचणीत सापडलेल्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा रास्त भावात खरेदी करत तेलंगणा सरकारने मदतीचा हात पुढे केला. त्याबद्दल आभार व्यक्त करतांनाच (Harshvardhan Jadhav) हर्षवर्धन जाधव यांनी राज्यातील सरकारवर टीका केली. दारु पिलेला माणूस जसा शुद्धीवर नसतो, तसे राज्यातील सरकारची देखील शुद्ध हरपली आहे. नुसतं एकमेकांवर चिखलफेक करण्यात सत्ताधारी धन्यता मानत आहे.

खरतरं कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवणे हे या सरकारचे काम होते, कारण (Farmers) शेतकरी महाराष्ट्रातला होता. (Marathwada) आम्ही विनंती केली, आंदोलन केले पण सरकारच्या वतीने कांदा खरेदी केली जाणार नाही, असे स्पष्ट सांगण्यात आले होते. त्यामुळे या अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादकांना चांगला भाव मिळवून देण्यात आणि त्यांचा कांदा तेलंगणात विकण्यात आम्हाला यश आले आहे, असा दावा जाधव यांनी केला.

यापुढे देखील आम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही, त्याला मरू देणार नाही. कायम त्याच्या पाठीशी उभे राहू. आपण देखील आता इतर कुणाच्या मागे न धावता शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या बीआरएसच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे, असे आवाहन देखील हर्षवर्धन जाधव यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com