Sharad Pawar Vs Ajit Pawar : सुनील तटकरेच अजितदादांची साथ सोडणार, शरद पवार गटाच्या नेत्यांनं पेटवली वात

Sunil Tatkare Vs Mehboob Shaikh : सोडून गेलेल्या लोकांना आमच्या पक्षात पुन्हा प्रवेश नाही, असे ठरलेले आहे. परतीची वाट बंद असल्याने अजित पवार गटातील लोकांना भाजपमध्ये जाण्याशिवाय पर्याय नाही.
Sunil Tatkare, Ajit Pawar
Sunil Tatkare, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : सत्तेत असल्याशिवाय कामे होत नाहीत, अशी भूमिका घेत राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार बाहेर पडले आणि उपमुख्यमंत्री झाले. यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गटात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या. सत्तेत असूनही ४ जूनंतर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेच Sunil Tatkare भाजपची वाट धरणार असल्याचा दावा शरद पवार गटाच्या नेत्याने केला आहे.

शरद पवार गटातील अनेक नेते काँग्रेसमध्ये जाणार असल्याचे विधान करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. यावर शरद पवार Sharad Pawar गटाचे राज्य युवकचे नेते महबूब शेख यांना छेडले. यावर त्यांनी तटकरेच भाजपात जाणार असल्याचे सांगितले. यावरून शरद पवार आणि अजित पवार गट पुन्हा एकदा आमनेसामने येण्याची शक्यता आहे.

मेहबूब शेख म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या निकालादिवशी अजित पवार Ajit Pawar गटातील अनेक आमदार बाहेर पडणार आहेत. चार जूनंतर अजितदादांची नौका बुडालेली असणार आहे. त्या नौकेत कुणीच बसण्यास तयार नसेल. हे माहीत असल्याने खुद्द सुनील तटकरेच भाजपच्या नावेत बसण्याच्या तयारीत आहेत, असेही शेख विधान केले. याला तटकरे आता काय उत्तर देणार, याकडे लक्ष आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सुनील तटकरेंनी डिवचलं...

ज्येष्ठ शरद पवारांनी लोकसभेनंतर काही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता असल्याचे भाकित केले होते. त्यानंतर आता शरद पवार गट काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींची Sonia Gandhi वेळ मागत आहेत. यावरून तटकरेंनी शरद पवार गटावर निशाणा साधला होता. शरद पवार गटातील आमदार काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचे दावा त्यांनी केला होता. यावर मेहबूब शेख यांनी तटकरेंना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.

Sunil Tatkare, Ajit Pawar
Ajit Pawar Vs Devendra Fadnavis : महायुतीत होणार बंड? बोरनारेंनी घेतले दोन अर्ज; भाजपच्या भूमिकेकडे लक्ष...

अजित पवार गटाला टोला

सोडून गेलेल्या लोकांना आमच्या पक्षात पुन्हा प्रवेश नाही, असे ठरलेले आहे. परतीची वाट बंद असल्याने अजित पवार गटातील लोकांना भाजपमध्ये जाण्याशिवाय पर्याय नाही. शरद पवारांवर प्रेम असणारे लोक सध्या राहिलेले असून ते कोठेही जाणार नाहीत. दरम्यान, गरवारे क्लबमध्ये झालेल्या बैठकीत अजित पवार गट पराभूत मानसिकतेत असल्याचे दिसून आले आहे. आगामी निवडणुकीत त्यांना पक्ष फुटीची भीती असल्याचे त्यांचे नेते नैराश्येतून विधाने करत असल्याचा टोला मेहबूब शेख यांनी लगावला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Sunil Tatkare, Ajit Pawar
Amol Kolhe vs. Shivajirao Adhlrao Patil : शिरूरच्या 'किल्ल्या'साठी कोल्हे-आढळराव पाच वाजेपर्यंत झुंजणार !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com