Amol Kolhe vs. Shivajirao Adhlrao Patil : शिरूरच्या 'किल्ल्या'साठी कोल्हे-आढळराव पाच वाजेपर्यंत झुंजणार !

Lok Sabha Election 2024 : या मतदारसंघावर कोणाचा हक्क राहणार यावर दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून दावे-प्रतिदावे केले जात होते. पण आपला खासदार कोण होणार, यासाठी मतदारांना सायंकाळी पाच वाजेपर्यंत ईव्हीएममधून बाहेर येणाऱ्या आकड्यांकडे लक्ष ठेवावे लागणार आहे.
Shivajirao Adhalrao Patil-Amol Kolhe
Shivajirao Adhalrao Patil-Amol KolheSarkarnama

Shirur News : लोकसभेच्या निवडणुकीत शिरूरचा किल्ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडून पुन्हा ताब्यात घेण्यासाठी अजितदादा पवार यांनी खेळी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे शिलेदार आणि ज्येष्ठ नेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना आपल्याकडे ओढले. डॉ. कोल्हे यांच्या विरोधात आढळराव यांना उमेदवारी देत अजितदादांनी खासदार कोल्हे यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले.

दुसरीकडे या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत आपलाच खासदार विजयी व्हावा, यासाठी पवारसाहेबांनी या मतदारसंघात विशेष लक्ष घालच कोल्हे यांच्यामागे मोठी ताकद उभी केली. यासाठी विविध स्तरातून प्रयत्न करण्यात आले. बारामती लोकसभेची निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर अजितदादांनी शिरूरमध्ये विशेष लक्ष देत मोठ्या प्रमाणात प्रचारसभा घेतल्या.

शिरूरचा किल्ला आपल्या ताब्यात घेण्यासाठी अजित पवार अखेरच्या तीन दिवसांत या मतदारसंघात ठाण मांडून बसले होते. मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यापासून या मतदारसंघावर कोणाचा हक्क राहणार यावर दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून दावे-प्रतिदावे केले जात होते. पण आपला खासदार कोण होणार, यासाठी मतदारांना सायंकाळी पाच वाजेपर्यंत ईव्हीएममधून बाहेर येणाऱ्या आकड्यांकडे लक्ष ठेवावे लागणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Shivajirao Adhalrao Patil-Amol Kolhe
Ravindra Dhangekar Vs Murlidhar Mohol : मोहोळ गुलाल उधळणार की धंगेकराचा ‘हात’ बळकट होणार ? 4 जूनला 3 वाजता कळणार

बारामती (Baramati) लोकसभा मतदारसंघानंतर सर्वाधिक चर्चा ही शिरूर लोकसभा मतदारसंघातील लढतीची झाली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून दोन पक्ष तयार झाले. राष्ट्रवादी काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांनी अजित पवार यांच्याबरोबर राहत राज्यात सत्ताधारी असलेल्या एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारला जाहीर पाठींबा दिला. त्यानंतर सरकारला पाठींबा देणाऱ्या अजित पवार यांच्यासह काही नेत्यांना मंत्रीमंडळात स्थान देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या बहुतांश आमदारांनी अजित पवार यांच्या मागे राहण्याचा निर्णय घेतला. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे देखील अजितदादांबरोबर जातील, अशी चर्चा होती. मात्र कोल्हे यांनी शरद पवार यांच्याबरोबर राहणे पसंत केले.

Shivajirao Adhalrao Patil-Amol Kolhe
Shrirang Barne Vs Sanjog Waghere: मावळाचा शिलेदार बाण उचलणारा की मशाल पेटवणारा?

शिरूरचे खासदार कोल्हे हे आपल्याकडे येणार नाहीत, हे लक्षात आल्यानंतर त्यांच्या कार्यपद्धतीवर कडक शब्दात टीका करत या निवडणुकीत त्यांना पाडणार असल्याचे अजित पवारांनी जाहीर केले होते. त्यानंतर झालेल्या प्रत्येक जाहीर कार्यक्रमात अजितदादांनी कोल्हे यांना पाडणार म्हणजे पाडणारच! अशी भूमिका जाहीरपणे घेतली. अजितदादांनी दिलेले आव्हान स्विकारत पवारसाहेबांनी खासदार कोल्हे यांनाच आपल्या पक्षाकडून उमेदवारी जाहीर केली. महायुतीच्या जागावाटपामध्ये शिरुरची जागा अजित पवारांकडे आल्याने उमेदवाराची शोधाशोध सुरू झाली. राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र त्यांनी असमर्थता दाखविल्याने तगड्या उमेदवाराची शोधाशोध सुरू होती.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीकडे उमेदवार उपलब्ध नसल्याने या मतदारसंघातून कोल्हे यांच्या विरोधात झुंज देण्यासाठी अजित पवारांनी मोठी खेळी केली. मुख्यमंत्री शिंदे यांचा शिलेदार अशी ओळख असलेल्या माजी खासदार आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून घेत त्यांना उमेदवारी देण्यात आली. गेल्या निवडणुकीत देखील या मतदारसंघात कोल्हे विरूद्ध आढळराव अशी लढत झाली होती. त्यामध्ये कोल्हे यांच्या बाजुने मतदारांनी कौल दिला होता.

बारामती लोकसभा मतदारसंघा पाठोपाठ शिरूर लोकसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा झाली. मंगळवारी 4 जूनला या मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे. रांजणगाव येथे ही मतमोजणी होणार असून शिरूर मधे 28 फेऱ्या होतील. मतमोजणीच्या प्रत्येक फेरी नंतर कोणत्या उमेदवाराला किती मते मिळाली, हे जाहीर केले जाणार आहे. शिरूरचा किल्ला कायम राखण्यात अमोल कोल्हे यशस्वी होणार की, कोल्हे यांना पाडण्याची अजित पवार यांनी केलेली घोषणा खरी होणार याचा फैसला मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत होणार आहे.

Shivajirao Adhalrao Patil-Amol Kolhe
Lok Sabha Election 2024 Result : वेळ ठरली! बारामती, पुणे, शिरूर अन् मावळात कुणाचं वर्चस्व.. दुपारपर्यंतच होणार स्पष्ट

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com