Jitendra Awhad News : आव्हाड समर्थकांकडून सहाय्यक आयुक्तांना मारहाण

NCP News : आव्हाडांच्या कुटुंबियांना धमकवण्याचा आरोप, तर कथित ऑडिओ क्लिपमुळे ठाण्यात खळबळ उडाली
Jitendra Awhad News
Jitendra Awhad News Sarkarnama

Thane News : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांकडून सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण करण्यात आली आहे. तर महेश आहेर यांच्यावर आव्हाडांच्या कुटुंबियांना धमकवण्याचा आरोप करण्यात आला आहे.

तसेच व्हायरल झालेली कथित ऑडिओ क्लिप ही महेश आहेर यांची असल्याचा दावा केला जातोय. यातूनच आव्हाडांच्या समर्थकांनी आहेर यांना मारहाण केल्याचे समोर आले आहे.

आहेर हे ठाणे महापालिकेत सहाय्यक आयुक्त आहेत. मात्र, या कथित ऑडिओ क्लिपमुळे ठाण्यात खळबळ उडाली आहे. या कथित ऑडिओ क्लिपमध्ये आहेर आणि अन्य व्यक्तीमध्ये संभाषण झाले. त्या संभाषणामध्ये आहेर यांनी आव्हाडांना मारहाण करण्याची भाषा केल्याचे समोर आले आहे. तसेच आव्हाडांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Jitendra Awhad News
Chinchwad By Election : राज ठाकरे मोठ्या भावासारखे पाठीशी उभे राहिले; पाठिंब्यानंतर अश्विनी जगतापांची भावना

आव्हाडांच्या मुलीला आणि जावयाला उडवायच असे कथित ऑडिओ क्लिपमध्ये संभाषण असल्यामुळे खळबळ उडाली आहे. तसेच यावर आव्हाड बोलताना म्हणाले, ''तो स्वत:च्या तोंडाने कबूल करत आहे. मी ही बातमी टीव्हीवर पाहिली. माझ्या मुलीला स्पेनमध्ये मारणार आहेत. त्यासाठी बाबाजी नावाचा शूटर असल्याचे कथित ऑडिओ क्लिपमध्ये व्यक्ती बोलतोय'', असं आव्हाड म्हणाले.

Jitendra Awhad News
Supreme Court Hearing : सत्तासंघर्षात हे मुद्दे ठरणार गेम चेंजर? न्यायमूर्तींची टिप्पणी अन् महत्त्वाचे युक्तीवाद

''माझी मुलगी, जावयापर्यंत आणि माझ्या कुटुंबियांवर गोळ्या झाडणारा माणूस या जगात पैदा व्हायचाय, असंही ते यावेळी बोलताना म्हणाले. दरम्यान, ही कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर आहेर यांना आव्हाडांच्या समर्थकांकडून मारहाण झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत कोणतीही तक्रार अद्याप दाखल करण्यात आलेली नाही.

Jitendra Awhad News
Bhagatsingh Koshyari : 'कोश्यारींनी ठाकरे परिवाराशी जुळवून घेण्याचा प्रयत्न अनेकवेळा केला!'

दरम्यान, या सर्व प्रकरणावर उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली असून जितेंद्र आव्हाड यांना पूर्ण संरक्षण दिले जाईल. तसेच या सर्व प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली जाईल, असं फडणवीसांनी सांगितलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com