Chinchwad By Election : राज ठाकरे मोठ्या भावासारखे पाठीशी उभे राहिले; पाठिंब्यानंतर अश्विनी जगतापांची भावना

Chinchwad and Kasba By-Election : कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत मनसेने भाजपला सशर्त पाठिंबा दिला
Chinchwad By Election and MNS
Chinchwad By Election and MNS Sarkarnama

पिंपरी : कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) भाजपला काल सशर्त पाठिंबा जाहीर केला. त्याबद्दल मनसे प्रमुख राज ठाकरे हे मोठ्या भावासारखे पाठीशी उभे राहिल्याबद्दल त्यांची कायम ऋणी राहीन, अशी भावना चिंचवडमधील भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी आज व्य़क्त केली.

राज ठाकरे यांनी शब्द पाळल्याबद्दल त्यांना अश्विनी जगताप यांनी धन्यवाद दिले आहेत. मनसेने पाठिंबा दिला असला, तरी ते भाजपच्या प्रचारात सहभागी होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तरीही, त्याबद्दल महायुतीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी राज ठाकरे, त्यांच्या नेत्यांचे आणि पक्षाचे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष सचिन चिखले यांचे आभार मानले आहेत.

Chinchwad By Election and MNS
Kasba By-Election : कसब्यात मनसे-राष्ट्रवादीमध्ये जोरदार जुंपली : 'ट्विटर वॉर' सुरूच..

पतीच्या निधनाचे दुःख अजून विरलेही नसताना पोटनिवडणुकीला सामोरे जाण्याची वेळ आली. अशा कठीण प्रसंगी मनसे आणि त्या पक्षाचे प्रमुख ठाकरे हे मोठ्या भावासारखे माझ्या पाठीशी उभे राहिले आहेत. त्यांच्या या पाठिंब्याबद्दल मी त्यांची कायम ऋणी राहीन, अशा भावना अश्विनी जगताप यांनी व्यक्त केल्या आहेत.

Chinchwad By Election and MNS
Shivsena News; शिंदे गटात सध्या रेट कार्डनुसार पक्षप्रवेश?

यासंदर्भात अश्विनी लक्ष्मण जगताप प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हणतात, “माझे पती आणि शहराच्या विकासाचे शिल्पकार आमदार लक्ष्मण जगताप यांचे ३ जानेवारी रोजी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे आम्हा जगताप परिवारावरच नाही तर चिंचवड विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यातून सावरण्यासाठी राज्यातील आणि शहरातील अनेक नेत्यांनी, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व नागरिकांनी आम्हाला आधार दिला.

Chinchwad By Election and MNS
Kasba By-Election News : कसब्यात प्रचाराची रणधुमाळी अन् फडणवीस बापटांच्या भेटीला

आमच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही आमच्या घरी येऊन दिवंगत लक्ष्मण जगताप यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच माझ्याशी संवाद साधून कोणत्याही प्रसंगात भावासारखे पाठीशी उभे राहण्याचे वचन त्यांनी मला दिले होते. ते पाळले.

मनसे नेते अनिल शिदोरे, बाबू वागस्कर, किशोर शिंदे यांनी भाजप शहराध्यक्ष भोसरीचे आमदार महेश लांडगे, पक्षाचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, प्रदेश सदस्य अनुप मोरे यांच्यासोबत आज बैठक घेऊन काल जाहीर केलेला पाठिंबा दिला. राज ठाकरे हे राज्यातील एक मोठे मन असणारे नेते आहेत''. असं त्या म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com