ब्रेकिंग न्यूज : बैलगाडा शर्यतप्रेमींची प्रतीक्षा पुन्हा वाढली; सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलली!

ती सुनावणी येत्या बुधवारी (ता. १७ नोव्हेंबर) होण्याची शक्यता आहे.
Bullock cart race
Bullock cart raceSarkarnama
Published on
Updated on

मंचर (जि. पुणे) : “बैलगाडा शर्यती पूर्ववत सुरु होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात सोमवारी (ता. १५ नोव्हेंबर) होणारी सुनावणी तांत्रिक अडचणींमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. ती सुनावणी येत्या बुधवारी (ता. १७ नोव्हेंबर) होण्याची शक्यता आहे. याबाबतची अधिकृत माहिती सोमवारी उपलब्ध होईल,” अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी नवी दिल्लीतून रविवारी (ता. १४ नोव्हेंबर) दिली. (Supreme Court hearing on the bullock cart race has been postponed)

दरम्यान, बैलगाडा शर्यतीच्या सुनावणीकडे राज्यातील बैलगाडा प्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे. राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार हे नवी दिल्ली येथे आज गेले आहेत. त्यांच्यासमवेत पशुसवर्धन खात्यातील उच्चपदस्थ अधिकारी, विधी तज्ज्ञ व बैलगाडा मालकही आहेत. बैलगाडा शर्यतीवरी बंदी उठवण्यासाठी सोमवारी (ता. १५) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. त्या पार्श्वभूमीवर प्रभावी युक्तिवाद होण्यासाठी ज्येष्ठ विधी तज्ञांबरोबर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी संवाद साधलेला आहे.

Bullock cart race
पुणे जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश; व्हॉट्‌सअपच्या ग्रुप ॲडमिनला इशारा

ज्येष्ठ विधीज्ञ शेखर नाफडे यांच्याशी शनिवारी (ता. १३ नोव्हेंबर) संध्याकाळी पाच वाजता व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, गृहराज्य मंत्री सतेज पाटील, सुनील केदार, खासदार डॉ. अमोल कोल्हे, राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांनी चर्चा केली. कॉन्फरन्सचे आयोजन सरकारी वकील ॲड सचिन पाटील यांनी केले होते. या व्हीडिओ कॉन्फरन्समध्ये पशुसंवर्धन खात्याचे उपायुक्त डॉ. शैलेश केंडे, सहाय्यक आयुक्त डॉ प्रशांत भड, अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे प्रतिनिधी संदीप बोदगे, रामकृष्ण टाकळकर सहभागी झाले होते.

Bullock cart race
कोरे, आवाडे गटाचे मतदार विरोधकांच्या हाती लागू नयेत यासाठी महाडिकांनी आखली विशेष रणनीती !

नवी दिल्ली येथे रविवारी (ता.१४) सर्वोच्य न्यायालयातील ज्येष्ठ विधीज्ञ ॲड शेखर नाफडे यांची केदार यांनी भेट घेऊन चर्चा केली आहे. त्यानंतर यासंदर्भात दुपारी साडे बारा वाजता नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथून सर्वोच्य न्यायालयातील ज्येष्ठ विधीज्ञ ॲड मुकुल रोहतगी यांच्यासोबत बैलगाडा दाव्याबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा झाली. या वेळी झालेल्या चर्चेत मुंबईहून वळसे पाटील सहभागी झाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com