पुणे जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश; व्हॉट्‌सअपच्या ग्रुप ॲडमिनला इशारा

त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पुण्याच्या ग्रामीण भागात कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
section 144
section 144Sarkarnama

पुणे : अमरावती, नांदेड, मालेगाव येथील दंगलीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जमावबंदीचा आदेश (१४४ कलम) लागू करण्यात आला आहे. ही जमावबंदी आजपासून (ता. १४ नोव्हेंबर) लागू करण्यात आली असून ती पुढील सात दिवस म्हणजेच २० नोव्हेंबर रोजीच्या रात्रीच्या १२ पर्यंत असणार आहे, असे पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. (Section 144 applicable in Pune district : Collector Dr. Deshmukh's order)

त्रिपुरा येथील घटनेच्या निषेधार्थ रझा अकादमीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चाच्या वेळी हिंसाचार झाला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘बंद’च्या वेळीही तोडफोड झाली होती. तसेच, मालेगाव, नांदेड, कारंजा, पुसद या ठिकाणीही हिंसाचार उसळला होता. त्या घटनांचे पडसाद पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही उमटण्याचे संकेत मिळाले आहेत. काही समाजकंटक हे सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पुण्याच्या ग्रामीण भागात कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

 Collector circular
Collector circular
section 144
मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्ष वाटून घेतलं असतं तर काय बिघडलं असतं?

पत्रकात जिल्हाधिकारी देशमुख यांनी म्हटले आहे की, पुणे जिल्ह्यात आजपासून पुढील सात दिवस जमावबंदी असणार आहे. त्यात कोणत्याही व्यक्तीस इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, व्हॉट्‌स अप आदी समाज माध्यमांवर जातीय तणाव निर्माण होईल, अशा गोष्टी प्रसारीत करण्यास मनाई करण्यात आली आहे. जातीय तेढ निर्माण करणाऱ्या गोष्टी इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, व्हॉट्‌स अप या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारीत झाल्यास त्याला ॲडमिन जबाबदार असतील. चुकीची माहिती किंवा अफवा पसरवणे, पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र येणे, शस्त्र, लाठी-काठी बाळगण्यासही मनाई असणार आहे. जातीय तणाव निर्माण होईल, अशा मजुकराचे फ्लेक्स लावणे व घोषणा देणे, यास बंदी असणार आहे.

section 144
जेव्हा जयंत पाटील लोकलने प्रवास करतात...

वरील गोष्टींचे उल्लंघन केल्यास कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी देशमुख यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. तशा आशयाच पत्रक जिल्हाधिकाऱ्यांनीही काढले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com