आषाढीची पूजा कोण करणार, ठाकरे की फडणवीस? न्यायालयाच्या आदेशानंतर वाढली अनिश्चितता

सर्वोच्च न्यायालयाने बंडखोर आमदारांना दिलासा दिला आहे.
Devendra Fadnavis-Uddhav Thackeray
Devendra Fadnavis-Uddhav ThackeraySarkarnama

मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 16 बंडखोर आमदारांना सर्वोच्च न्यायालयात दिलासा मिळाला आहे. अपात्रतेच्या नोटिशीवर आपले म्हणणे मांडण्यासाठी त्यांना न्यायालयाने 12 जुलैपर्यंतची मुदत दिली आहे. तसेच या प्रकरणावरील पुढील सुनावणी 11 जुलै रोजी होणार आहे. पण या कालावधीत महाविकास आघाडी सरकारविरोधात विधीमंडळात अविश्वास ठराव आणता येणार की नाही, याबाबत मात्र न्यायालयाने कोणताही आदेश दिलेला नाही. परिणामी येत्या 10 जुलै रोजी पंढरपुरात विठूरायाची आषाढी पूजा कुणाच्या हस्ते होणार, याबाबत अनिश्चितता वाढली आहे. (CM Uddhav Thackeray Latest Marathi News)

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने बंडखोरी केल्यानंतर यंदाची आषाढी पूजा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मुख्यमंत्री म्हणून करतील, असे होर्डिंग्ज राज्यात अनेक ठिकाणी लागले आहेत. तसेच सोशल मीडियातही त्याबाबत अनेक संदेश फिरत आहेत. यंदा 10 जुलै रोजी आषाढी एकादशीचा महासोहळा पंढरपूरात रंगणार आहे.

Devendra Fadnavis-Uddhav Thackeray
वकील विशाल आचार्य यांनी पाठवला झिरवळांना मेल; यावरून सुरू आहे न्यायालयात युक्तीवाद

एकनाथ शिंदे गटाकडून भाजपला समर्थन दिल्यानंतर आघाडी सरकार अल्पमतात येईल आणि आषाढी एकादशीपर्यंत उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर राहणार नाहीत. त्यामुळे फडणवीस हे मुख्यमंत्री बनतील, असा दावा भाजप कार्यकर्ते व नेत्यांकडून केला जात आहे.

पण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदासाठी आणखी काही काळ वाट बघावी लागण्याची शक्यता आहे. न्यायालयाने आज आदेश देताना त्यामुळे फ्लोअर टेस्टचा उल्लेख केला नाही. केवळ अपात्रतेची नोटीस आलेल्या आमदारांना बारा जुलैपर्यंत म्हणणे मांडण्यासाठी मुदत दिली आहे. तर आषाढी एकादशी 10 जुलै रोजी आहे.

Devendra Fadnavis-Uddhav Thackeray
नबाम रेबिया, आशिष शेलार प्रकरणाचा शिंदेंकडून दाखला; सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तीवाद

त्यामुळे या आमदारांना दिलासा मिळाला. त्यानंतर शिवसेनेच्या वकिलांनी न्यायालयाला फ्लोअर टेस्टबाबत टाळण्याबाबतचा आदेश देण्याचे विनंती करण्याचा प्रयत्न केला. पण न्यायालयाने त्यावर थेट आदेश देण्यास नकार दिला.

न्यायालयाच्या या आदेशामुळे आता ठाकरे सरकार तोपर्यंत राहणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या कालावधीत शिंदे गटाने ठाकरे सरकारचा पाठिंबा काढून घेत अविश्वास दर्शक प्रस्ताव दाखल केल्यास सरकारला त्याला सामोरे जावे लागू शकते. पण हा मुद्दाही वादाचा ठरू शकतो. त्यावरही सरकारकडून न्यायालयात धाव घेतली जाऊ शकते. त्यामुळे आता आषाढीची पूजा ठाकरे करणार की फडणवीस याबाबत अनिश्चितता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com